शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बेदाणा सौदे सावळीला हलविण्याच्या हालचाली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह व्यापाऱ्यांनी केला विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:54 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून डाव उधळण्याचा इशारा

सांगली : येथील मार्केट यार्डात सुरू असलेला बेदाणा सौदे सावळी (ता. मिरज) येथील जागेत हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह व्यापाऱ्यांनी विरोध केला असून, त्याबाबत बाजार समितीकडे लेखी तक्रार केली आहे.सौदा हलविण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला असून, संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलकुंबे, सुरेश बसुगडे यांनी बाजार समितीचे सहायक सचिव नितीन कोळसे यांनी निवेदन दिले. बाजार समितीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणा सौदा काढला जातो. शेतकरी आणि खरेदीदारांसाठी सोयीची आणि सुरक्षित जागा आहे. याशिवाय इतर सोयीसुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात बेदाण्याची आवक सुरू आहे. प्रत्येक सौद्यावेळी किमान २०० पेक्षा अधिक गाड्या बेदाणा आवक आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी बाजार समितीच्या सावळी येथील खुल्या जागेत हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप संजय खोलकुंबे यांनी केला आहे. बाजार समितीने चार-पाच वर्षांपूर्वी सावळी येथे सुमारे १४ एकर जागा खरेदी आहे. मात्र सध्या चांगले रस्ते, कोणत्याही सुविधा नाहीत. सौदे हलविण्यास काही व्यापाऱ्यांचा विरोधही आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली मार्केट यार्डातील बेदाणा सौदे सावळीला हलविण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खोलकुंबे यांनी दिला आहे.यावेळी शैलेश गारे, विजय खोलकुंबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष सुरेश वसगडे, शिरशेल सलगरे, दीपक कनवाडे, बाळासाहेब भानुसे आदी उपस्थित होते.

शेतकरी-व्यापाऱ्यांना सुविधा देणार : सुजय शिंदेमार्केट यार्डात बेदाण्याची आवक वाढली असून, जागा अपुरी पडत आहे. सावळी येथे मोठी जागा आहे. या जागेवर बेदाण्याचे स्वतंत्र मार्केट उभे करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे. सध्या बाजार समितीकडे आर्थिक तरतूद नसल्याने व्यापाऱ्यांना पैसे घालण्यास सुचविले आहे. व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन चांगले शेड उभे करणार आहोत. याशिवाय त्या ठिकाणी मूलभूत सर्व सुविधा देणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार