वर्ग चारची पदे निरसित करू नयेत, वर्ग चारची पदे ठेकेदारी व कंत्राटी पद्धतीऐवजी सरळसेवेने भरावीत, अनुकंपा भरती विनाअट करावी, २९ दिवस तत्वावर कार्यरत बदली कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून एकाच वेळी कायम करावे, यांसह २९ मागण्यांकरिता २७ रोजी काळी फित लावून काम, २८ रोजी काळ्या फितीसह दुपारी निदर्शने व २९ रोजी एक दिवस लाक्षणिक संप करणार असल्याचे निवेदन जिल्हा महासंघातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे यांना देण्यात आले. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाणे, गणेश धुमाळ, संदीप सकट, मिलिंद हारगे, संजय सडकर, कुमार कोलप, विशाल मेहतर, विजय वाघोले, रजनी धेंडवाल उपस्थित होते.
राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST