शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

सभापती बदलाच्या मिरजेत हालचाली

By admin | Updated: January 13, 2016 22:37 IST

पंचायत समिती : दिलीप बुरसे पायउतार होणार

मिरज : मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांना सभापतिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत. बुरसे यांनीही ठरलेला कालावधी पूर्ण होत असल्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. पंचायत समितीत नवीन सभापती निवडीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. शेवटचे सव्वा वर्ष राहिल्याने इच्छुकांची संख्या अर्धा डझनावर पोहोचली आहे. मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसप्रणित मदन पाटील गटाची सत्ता आहे. सभापतीपद सलग पाच वर्षे खुल्या वर्गासाठी आहे. सव्वावर्षाचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. सभापती बुरसे यांनाही तेवढाच कालावधी ठरवून देण्यात आला होता. त्यांची मुदत जानेवारीत पूर्ण होत असल्याने इच्छुकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मदन पाटील यांच्या निधनामुळे इच्छुकांनी सभापतींच्या राजीनाम्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना साकडे घातले होते. या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. बैठकीत प्रतीक पाटील यांनी बुरसे यांना राजीनामा देण्याची सूचना केली. बुरसे यांनीही तयारी दर्शविली आहे. या बैठकीस विशाल पाटील, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अमर पाटील, मिरज बाजार समितीचे सभापती अणासाहेब कोरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बुरसे यांनी राजीनामा देण्याचा नेत्यांना शब्द दिल्याने, नवीन निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. वेळोवेळी नेत्यांच्या आश्वासनामुळे प्रतीक्षेत असलेले कर्नाळचे प्रवीण एडके प्रमुख दावेदार आहेत. एडके यांच्याबरोबर बामणोलीच्या तेजश्री चिंचकर, सलगरेच्या जयश्री पाटील व म्हैसाळच्या जयश्री कबुरे यांच्यासह अर्धा डझन इच्छुकांनी सभापती पदावर दावा केल्याने, नेत्यांची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंचायत समितीमध्ये विरोधी राष्ट्रवादीचे सात सदस्य आहेत. या गटाने वेळोवेळी सभापती पदासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळीही हा गट सभापतीपद मिळविण्याच्या तयारीत असून, काँग्रेसच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. (वार्ताहर) जानेवारीअखेर राजीनाम्याची शक्यता सभापती दिलीप बुरसे जानेवारीअखेर राजीनामा देण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या माध्यमातून मला सभापतीपद व बाजार समितीचे संचालकपद मिळाले. पक्षाने दिलेल्या संधीमुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. कारकीर्दीवर पूर्णत: समाधानी आहे. पक्षसंघटनात्मक बांधिलकी व नेत्यांचा शब्द प्रमाण मानून सभापतिपदाचा राजीनामा देणार आहे.