शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी सांगलीत शासकीय कर्मचारी, शिक्षकांची मोटारसायकल रॅली; ..अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा दिला इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: September 21, 2022 12:16 IST

...अन्यथा बेमुदत संपावर जाणार

सांगली : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज, बुधवारी मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सांगलीतील स्टेशन चौकातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभेन झाली.आंदोलनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय सचिव पी. एन. काळे, जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, एस. एच. सूर्यवंशी, शरद पाटील, राजेंद्र कांबळे, दिलीप पाटील, गणेश धुमाळ, शीतल ढबू, प्रदीप पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद, अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या १७ वर्षांपासून सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. परंतु या मागणीची दखल राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. राज्यस्थान, छत्तीसगड व झारखंड या राज्यांतील २००५ नंतर शासन सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस रद्द करुन जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अन्यथा राज्यातील १७ लाख कर्मचारी आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहेत. म्हणूनच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी मोटारसायकल रॅलीचे काढण्यात आली आहे....अन्यथा बेमुदत संपावर जाणारजुन्या पेन्शनसाठी अनेक आंदोलन झाली आहेत. तरीही राज्य सरकार दखल घेत नाही. म्हणूनच राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी बेमुदत संपावरही जाण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शन सामाजिक सुरक्षा म्हणून तो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, त्या हक्कासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत, असेही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष पी. एन. काळे म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन