शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय डॉक्टर, ‘नीट’साठी वाढले 'इतके' लाख अर्ज 

By अविनाश कोळी | Updated: March 18, 2024 14:13 IST

दाखले बंधनकारक नसल्याने अर्ज वाढले

अविनाश कोळीसांगली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता देशपातळीवर होणाऱ्या ‘नीट-युजी २०२४’ या परीक्षेकरिता २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही आजपर्यंतची विक्रमी नोंदणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सव्वासात लाख विद्यार्थी वाढले आहेत. वैद्यकीय शिक्षणातील स्पर्धा प्रत्येक वर्षी वाढत आहे.

‘नीट’साठी अर्ज करण्याची १६ मार्च ही शेवटची तारीख होती. यंदाच्या विद्यार्थी नोंदणीने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ५ मे रोजी नीटची परीक्षा होणार आहे. १४ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. २०२३ मध्ये २०,७७,४६२ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा नोंदणी केली होती. यंदा २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीटसाठी अर्ज केला आहे.

जागा केवळ १ लाख ९ हजारदेशभरात ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतून एम. बी. बी. एस.च्या १,०९,१४५ जागा असून, यावर्षी या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डेन्टलच्या २७ हजार जागा आहेत. एम. बी. बी. एस., बी. डी. एस., आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि पशुवैद्यकीय या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीटच्या गुणांवरच होत असून, सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होतात.

दुरुस्तीची खिडकी तीन दिवस खुली‘नीट’च्या अर्जात माहितीअभावी अनेक विद्यार्थ्यांनी चुका केल्या असून, या चुका दुरुस्त करण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संधी दिली आहे. १८ ते २० मार्च या कालावधीत करेक्शन विंडो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोबाइल नंबर व ई-मेल आयडी वगळता विद्यार्थ्यांना अर्जात सर्व प्रकारची दुरुस्ती एकदाच करता येईल. फोटो, सही आणि बोटांचे ठसे अपलोड करण्यात चूक झाली असेल तर ते नव्याने अपलोड करता येतील.

दाखले बंधनकारक नसल्याने अर्ज वाढलेवैद्यकीय शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून, नीट परीक्षेसाठी दरवर्षी विक्रमी नोंदणी होत आहे. यंदा अर्ज करताना १० वी किंवा ११ वीचा निकाल व जात प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक नसल्याने परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी म्हणून ११ वीच्या अनेक विद्यार्थ्यांनीदेखील अर्ज केलेला आहे. त्यामुळेही परीक्षार्थींचा आकडा आणखी वाढला आहे.

नीट परीक्षेसाठी अर्ज करताना भरलेली माहिती नंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठीदेखील वापरली जाते. त्यामुळे नीट परीक्षेसाठी केलेल्या अर्जात झालेली चूक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत तत्काळ दुरुस्त करून घ्यावी. यासाठी विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टरexamपरीक्षाStudentविद्यार्थी