शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हृदय हेलावणारे चित्र, आईच्या मृत्यूनंतर पिलाला दिली माकडिणींनी माया; सांगलीतील बांबवडे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:21 IST

दूध पाजून पिलाचा केला सहकाऱ्यांनी सांभाळ

शिराळा : एकीकडे माणूस माणूसपण हरवत आहे, मात्र दुसरीकडे माकडांच्यात आपलेपण, सहकार्य केल्याची घटना पाहायला मिळाली. बांबवडे (ता. शिराळा) येथे वाहनाची धडक माकडीणीसह तिच्या पिलाला बसली. यामध्ये माकडिणीचा मृत्यू झाला, मात्र पाच-सहा दिवसांच्या पिलाला त्याच कळपातील माकडिणीने दूध पाजून तिला सांभाळण्यासाठी घेऊन गेली. आज माणूसकी हरवत असताना मुक्या प्राण्यांच्यात मात्र ममता, प्रेम आजही पहावयास मिळते.

शनिवार दि. ५ जुलै रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान वाटेगावचे राजेश साळुंखे यांचा फोन आला की एक वानर बांबवडे फाट्यावर पिलासमवेत गाडीला धडकले आहे. गाडीला धडकल्यानंतर कुत्र्यांनीही त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर रोकडे वस्तीवर कडबा व भिंतीच्या मध्ये सहा इंचाची फट होती. कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी या वानराने पिलासह या फटीचा संरक्षणासाठी उपयोग केला. गाडीच्या धडकेत वानराला डोक्याला गंभीर इजा दिसत होती. त्यामुळे पिलाच्या जिवालाही धोका होता.याबाबत तातडीने वनविभागाला कळवून वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष कदम, प्राणिमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड , गणेश निकम यांनी वानराला सुखरूप रेस्क्यू करून उपचार केले. मात्र, यामधे माकडिणीचा मृत्यू झाला.यानंतर या पिलाला शिराळा वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. याठिकाणी आईची ऊब जाणवेल अशा कपड्यांमध्ये या पिलाला ठेवले. दर दोन तासांनी दूध पाजण्यात येत होते. त्याची वैद्यकीय तपासणीही केली. रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान या परिसरात माकडांचा कळप गोळा झाला. या सर्वांनी आरडाओरडा चालू केला. यावेळी या पिलाला तेथील एका झाडाखाली कपड्यांवर ठेवले. यावेळी एक माकडीण त्याठिकाणी खाली आली. त्या पिलाला जवळ घेऊन घट्ट छातीला कवटाळले आणि त्या पिलाला झाडावर घेऊन गेली.हृदय हेलावणारे चित्रमाकडांच्या कळपातील इतर माकडिणींनी या पिलाला काही दुखापत वगैरे झाली का हे न्याहाळून पाहिले. त्यातील एका माकडिणीला यासारखेच एक पिल्लू होते. त्या माकडिणीने या पिलाला जवळ घेऊन त्याला दूध पाजले. आईचा मृत्यू झाला, मात्र इतर त्यांच्या कळपातील सहकाऱ्यांनी या पिलाला दिलेली माया हे दृश्य हृदय हेलावणारे होते.