शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड, तरुणास दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; मिरजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:26 IST

सांगली : बुधगाव (ता. मिरज ) येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड करत तिला त्रास देणाऱ्या तरुणास न्यायालयाने दोन ...

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड करत तिला त्रास देणाऱ्या तरुणास न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. चेतन रावसाहेब नांदणीकर (वय २२, रा. वनवासवाडी, बुधगाव) असे आरोपीचे नाव आहे. विशेष अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.खटल्याची माहिती अशी की, सन २०१३-१४ साली बुधगावमध्ये ही घटना घडली होती. फिर्यादी पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबासह बुधगावमध्ये राहण्यास होती. यावेळी दोन अल्पवयीन मुलांशी संगनमत करत आरोपीने मुलीला आपल्याशी प्रेम कर, तुझ्याशी लग्न करावयाचे आहे. लग्न नाही केले तर तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी वारंवार धमकी देत होता. तसेच आरोपी नांदणीकर याने तिचा हात पकडून व रस्त्याने जात-येत असताना तिला हाताने, डोळ्याने अश्लील इशारे तो करत असे. 

एकदा अल्पवयीन मुलाकडून त्याने पीडितेच्या घरासमोर चिठ्ठीही टाकली. ही बाब पीडित मुलीने घरी सांगितल्यानंतर त्याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस. के. कदम यांनी या प्रकरणाचा तपास करून नांदणीकर याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासत ही शिक्षा सुनावली. त्यानुसार दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड करण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCourtन्यायालय