शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केलेः मोहन प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 20:10 IST

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले असून भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांनी केली आहे.ते सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, नसीम खान, हर्षवर्धन पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहन प्रकाशभाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतमालाला हमीभाव नाही. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. यवतमाळमध्ये 25 शेतक-यांचा फवारणी करताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर नाचत असून,मोदी आणि जेटलींनी देश विकण्याचे काम सुरु केले आहे, असा घणाघाती आरोप मोहन प्रकाश यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी इंग्रजांची दलाली केली, ते सत्तेत बसून आज आम्हाला देशभक्ती शिकवू पाहत आहेत. काळा पैसा आणू म्हणणाऱ्या आणि १५ लाख रुपये बँक खात्यावर जमा करणा-यांनी किमान १५ हजार रुपयांची तरी मनीऑर्डर करायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला. भुपिंदरसिंग हुडाभाजपचे सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. युपीए सरकारच्या काळात समाधानी असणारा शेतकरी आज दुःखात आहे. शेतक-यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. धानाला भाव नाही मात्र तांदळाचे भाव वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 50 टक्क्याने कमी झाले आहेत देशात मात्र इंधनाचे दर वाढतच आहेत. तेलाचे दर वाढवून सरकारने 3 लाख कोटी रूपये कमावले आहेत. मोदी सरकार गरिबविरोधी आहे. निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेवर येताच शिफारशी लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले. युपीए सरकारच्या काळात हमीभावात दरवर्षी सरासरी 15 टक्के वाढ केली जायची या सरकारच्या काळात 4 टक्के ही वाढ नाही. नोटाबंदीमुळे देशातील उद्योगांना बसला असून उत्पादन घटले चीनमधून होणारी आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीचा खरा फायदा चीनलाच झाला आहे. देशभरात सरकारविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण असून जनआक्रोश मेळाव्याला जमलेला हा जसमुदाय परिवर्तनाचा संकेत आहे असे हुडा म्हणाले. अशोकराव चव्हाणराज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकार कसे चालवतात हे भाजपच्या लोकांना कळत नाही. या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. फसव्या घोषणा करणे आणि खोट्या जाहिराती देणे एवढेच काम या सरकारने केले आहे. राज्यातील शेतक-यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देऊ.