शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:10 IST

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.

ठळक मुद्देशिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिकामोडी लिपीतील राज्यातील पहिली भित्तीपत्रिका

सांगली : येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला. या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले. शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, अशा विविध विषयावर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले. या भित्तीपत्रिकेला 'शिवस्मरण' असे समर्पक नावही देण्यात आले.मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षा बिराजदार, वेदिका कुष्ठे, सौ, गिरीजा फडणीस, डॉ. सीमा इंदलकर, ऐश्वर्या डिसले, डॉ. वैशाली कुलकर्णी, प्रियांका कांबळे, ऋजुता देसाई, अस्मिता शेवाळे, सुजाता कुलकर्णी, ऐश्वर्या वैद्य, हर्षदा हंकारे, जान्हवी पुजारी, सोनाली पाटील, श्रीया कोल्हटकर, स्वाती घोडके, स्वप्नाली कुंभोजे विद्यार्थिनींनी हे मोडी लिपीतील लेख लिहीले. भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली तीही मोडी लिपीतील अक्षरांचीच.विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे 'शिवस्मरण' छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले. या भित्तीपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर, प्रा. आर. जी. देशपांडे, प्रा. डॉ. इसी, प्रा. डॉ. नंदिनी काळे, प्रा. डॉ. अनिल सुगते, प्रा. डॉ. भावना मारू, प्रा. वैशाली जोशी, प्रा. डॉ. संदीप दळवी, प्रा. अमृता ठिगळे, प्रा. मृदुला लेले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीSangliसांगली