शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर आमदार सुमनताई पाटील यांचे उपोषण स्थगित

By संतोष भिसे | Updated: October 3, 2023 19:01 IST

..अन्यथा महिन्यानंतर मंत्रालयासमोर उपोषण

सांगली : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील २३ गावांचा समावेश विस्तारित टेंभू योजनेत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण सायंकाळी मागे घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.आमदार अनिल बाबर यांची शिष्टाई यशस्वी झाल्यानंतर त्यांच्याहस्ते सुमनताई पाटील यांनी फळांचा रस घेतला. आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले. तासगाव तालुक्यातील आठ गावांचा समावेश विस्तारित टेंभू योजनेत करावा यासाठी दोघांनी सोमवारी सकाळपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी कालपासूनच वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु होते. पालकमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी मध्यस्थी केली, पण ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका सुमनताई व रोहित यांनी घेतली होती. रोहित यांनी प्रकृती चांगली नसतानाही आंदोलन सुरु ठेवले होते. मंगळवारी सकाळपासून मतदारसंघातून तसेच जिल्हाभरातून समर्थक कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. सिकंदर जामदार आदींनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सरकारवर टीकास्त्र सोडले.यादरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवसभरात दोनवेळा सुमनताई पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संवाद साधला. मागण्या जाणून घेतल्या. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे दोघांनी सांगितले. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार बाबर यांच्यामार्फत सुमनताई यांच्याशी संपर्क केला. चर्चेअंती फडणवीस यांनी महिन्याभरात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे मान्य केले. त्यानंतर सायंकाळी सुमनताई व रोहित पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

अन्यथा मंत्रालयासमोर उपोषणसुमनताई व रोहित पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार महिन्याभरात कार्यवाही झाली नाही, तर मंत्रालयासमोर उपोषण करु. मतदारसंघातील वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळेपर्यंत मागे हटणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीsumantai patilसुमनताई पाटीलRohit Patilरोहित पाटिलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस