शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: जिल्हा परिषदेच्या पटावर आमदार–माजी खासदार पुन्हा आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:10 IST

युती–आघाडीच्या घडामोडीकडे लक्ष

दत्ता पाटीलतासगाव : नगरपालिकेच्या पटावर झालेल्या बहुरंगी लढतीत खरा सामना आमदार रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय (काका) पाटील असाच झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पटावरही दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. या पटावर भाजप, काँग्रेस, शिवसेना, तसेच तिसऱ्या आघाडीची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.तासगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर माजी खासदार संजय काका पाटील यांचे अस्तित्वही कसोटीवर होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काका गटाच्या स्वाभिमानी आघाडीने तासगावचा गड काबीज केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सलग दोन पराभवानंतर नगरपालिकेतील विजयाने काका गटाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काका गटाने जोमाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.दुसरीकडे, तासगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गटांपैकी बहुतांश ठिकाणी आबा गटाचे परंपरागत वर्चस्व राहिलेले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आबा गटाला नेहमीच झुकते माप मिळाल्याचा इतिहास पाहायला मिळतो. त्यामुळे आमदार रोहित पाटील यांच्या शिलेदारांनी यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. परिणामी, नगरपालिकेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आबा-काका गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.ग्रामीण भागात काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, मनसे आणि तिसऱ्या आघाडीचेही काही ठिकाणी वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आबा–काका गटांबरोबरच अन्य पक्षांचा आणि तिसऱ्या आघाडीचा कलही निर्णायक ठरणार आहे.

मनोमिलनाची चर्चा पुन्हा ऐरणीवरनगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आबा–काका गटात मनोमिलन होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात दोन्ही गट प्रत्यक्षात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. निकालानंतर दोन दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील, तसेच दोन्ही गटांतील सर्व नव्या नगरसेवकांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला. या फोटोमुळे पुन्हा एकदा मनोमिलनाच्या चर्चेला हवा मिळाली आहे.

युती–आघाडीच्या घडामोडीकडे लक्षतासगाव नगरपालिका निवडणुकीत प्रबळ सर्वच पक्षांनी युती–आघाडीला कोलदांडा घातला होता. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती आणि आघाडी होणार का? याबाबत उत्सुकता कायम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Politics: MLA vs Ex-MP face-off again in Zilla Parishad.

Web Summary : After municipal polls, Rohit Patil and Sanjay (Kaka) Patil groups clash again in Zilla Parishad elections. Alliances will be crucial.