शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मिरजेतील वादग्रस्त जागेवर आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाचा दावा, सुनावणी पुन्हा लांबणीवर

By श्रीनिवास नागे | Updated: January 11, 2023 16:51 IST

दोन्ही गटांकडून न्यायालयीन डावपेच

मिरज : मिरजेत बसस्थानकाजवळ अमर थिएटर समोर असलेल्या वादग्रस्त जागेबाबत कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही गटांना बुधवारी आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद यांनी जागेच्या मालकीचा दावा केला. प्रकरणाची पुढील सुनावणी दि. १९ जानेवारी रोजी होणार आहे. आज, बुधवारी सकाळी तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर या प्रकरणाची दुसरी सुनावणी झाली. सुनावणीस वहिवाटदारांपैकी चौघे गैरहजर होते. ब्रह्मानंद पडळकर यांच्यातर्फे हजर झालेले वकील एच. आर. मुल्ला यांनी जागेच्या मालकीचा दावा केला. कोणताही एकतर्फी निर्णय होऊ नये म्हणून पडळकर यांनी न्यायालयात कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. कब्जेदारांतर्फे ए. ए. काझी, समीर हंगड, नितीन माने यांनी बाजू मांडली.दोन्ही गटांकडे जागेच्या मालकीबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. कागदपत्रे उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्यामुळे दोन्ही गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावर तहसीलदारांनी आणखी एका आठवड्याची मुदतवाढ देऊन पुढील सुनावणी दि. १९ रोजी होईपर्यंत वादग्रस्त जागेत ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश दिले.दोन्ही गटांकडून न्यायालयीन डावपेचमिरजेतील संबंधित वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी पोकलॅनद्वारे दहा दुकाने रातोरात उद्ध्वस्त केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जागा मालकीचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाल्याने दोन्ही गटांकडून न्यायालयीन डावपेच सुरू आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGopichand Padalkarगोपीचंद पडळकर