शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील आणखी चार व्यापारीही रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:28 IST

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यातआणखी चार व्यापारीही रडारवरमाजी नगरसेवकाची कुरुंदकरशी जवळीक

सांगली : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे.

कुरुंदकर व अश्विनी बिद्रे यांनी सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात एकत्रित नोकरी केली आहे. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने, त्यांची चांगली ओळख झाली. यातून त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली. दोघांची दोन-तीन महिन्यांच्या अंतराने सांगलीतून जिल्ह्याबाहेर बदली झाली.

कुरुंदकरने पालघर जिल्ह्यातील नवघर पोलिस ठाण्यात सेवा बजाविल्यानंतर त्याची ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली. अश्विनी बिद्रे यांची सांगलीतून रत्नागिरीला बदली झाली. तेथे दीड वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. पण त्या तिथे हजर झाल्याच नाहीत. गेले दीड वर्ष त्या बेपत्ता आहेत.

चार दिवसांपूर्वी कुरुंदकरला अटक झाल्याने, या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. कुरुंदकर यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात सेवा बजावली आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा कार्यभार तब्बल तीन वर्षे त्यांनी सांभाळला होता. त्यांची सांगली व कुपवाड परिसरातील नगरसेवक व व्यापाऱ्याशी चांगली ओळख होती. कुरुंदकरकडे त्यांची नेहमी उठ-बस असायची.

अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक, तसेच काही व्यापारी कुरुंदकरच्या संपर्कात होते, अशी माहिती कुरुंदकरच्या कॉल डिटेल्सवरुन पुढे आली आहे. त्या माहितीच्याआधारे नवी मुंबई पोलिसांचे पथक तपास करीत आहे.

सांगली आणि कुपवाडमधील चार व्यापाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ताचे कनेक्शन सांगलीपर्यंत आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

कुरुंदकरशी जवळीककुपवाड परिसरातील एका माजी नगरसेवकाची कुरुंदकरशी चांगली जवळीक होती. कुरुंदकरने या माजी नगरसेवकाचा फ्लॅट अश्विनी यांना सांगलीत राहण्यास दिला होता. तसेच अश्विनी बेपत्ता झाल्या, त्यावेळी हा माजी नगरसेवक कुरुंदकरच्या संपर्कात होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. या माजी नगरसेवकाला चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली