शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

गणपती पंचायतन संस्थानच्या जागांबाबत दिशाभूल - विजयसिंहराजे पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:08 IST

Muncipal Corporation Sangli Royal familiy-सांगली शहरातील गंजीखान्याची जागा कायदेशीरदृष्ट्या गणपती पंचायत संस्थानच्या मालकीची आहे. तरीही या जागेसह अन्य काही जागांबाबत महापालिका, पदाधिकारी, नगरसेवक वारंवार दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संस्थानच्या कोणत्याही जागेबाबत अशी माहिती दिल्यास किंवा त्यावर कोणत्याही योजना आखल्यास कायदेशीर कारवाई करु, असा इशारा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी दिला आहे.

ठळक मुद्देगणपती पंचायतन संस्थानच्या जागांबाबत दिशाभूल - विजयसिंहराजे पटवर्धनगंजीखान्यासह अन्य जागा संस्थानच्या मालकीच्याच

सांगली : शहरातील गंजीखान्याची जागा कायदेशीरदृष्ट्या गणपती पंचायत संस्थानच्या मालकीची आहे. तरीही या जागेसह अन्य काही जागांबाबत महापालिका, पदाधिकारी, नगरसेवक वारंवार दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संस्थानच्या कोणत्याही जागेबाबत अशी माहिती दिल्यास किंवा त्यावर कोणत्याही योजना आखल्यास कायदेशीर कारवाई करु, असा इशारा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी दिला आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे संबधित अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने काळीखण, जुना जनावरांचा बाजार, गंजीखाना अशा विविध जागांबाबत दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे. श्री गणपती पंचायतन संस्थान कायदा १९४० मधील कलम २० व १९ ब प्रमाणे विशेषत: त्याचे सर्व मिळकतीवर संस्थानच्या उत्तराधिकारी म्हणून माझा हक्‍क स्पष्ट होतो.

परंतु महापालिकेची सत्ता हाती आली म्हणून पंचायतन संस्थानच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा घेणे व त्यावर वेगवेगळ्या योजनांची आमिष दाखवुन नगारिकांमध्ये भुलभुलैय्या वातावरण निर्माण करणे या गोष्टी योग्य नाहीत. विनाआधार विवाद निर्माण करुन सांगलीच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचे काम स्वत: महापालिका करीत आहे.गणपती पंचायतन संस्थानला कोणत्याही भुसंपादन कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत. त्याबाबत न्यायालयात केसेसही सुरु आहेत. गंजीखान्याच्या जागेबाबतही मुंबई उच्च न्यायालयाने दि. ९ जुलै १९९९ चा मनाई हुकूम केला आहे आणि १० ऑक्टोबर, १९७४ चा निकालही पंचायतनच्या बाजुने झाला आहे. आमच्याकडून नियुक्‍त केलेल्या व सेवेतील कोणत्याही अधिकारी, कुटुंबियांबरोबर परस्पर व्यवहार दर्शवून हक्क प्रस्थापित करण्याचा खोटा प्रयत्नही कुणी करु नये.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गंजीखान्याची जागा स्वच्छ करीत असल्याबाबत महापालिकेने तोंडी कळविले होते. त्यानंतर आम्ही १५ जानेवारी २०२१ रोजी अभियानास सहकार्य राहिल, असे लेखी पत्र महापालिकेस पाठवून त्याची पोहच घेतली होती. असे असताना या जागेबाबत खोटी माहिती पसरविण्यात आली. वास्तविक माळबंगल्याची जागा जेव्हा तत्कालिन आयुक्तांच्या मागणीनुसार सार्वजनिक योजनेस पंचायतन संस्थानने दिली तेव्हा ती रितसर कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करुन दिली होती. त्यामुळे कोणत्याही तोंडी, लेखी पत्राचा आधार घेऊन चुकीची माहिती पसरविण्याचे उद्योग कुणी करु नयेत.महापालिकेने स्वत:च कबुल केले आहे की, मंजुर विकास आराखड्यात गंजीखाना जागेवरील म्हणजेच श्री गणपती पंचायतन संस्थानच्या जागेवरचे आरक्षण उठले आहे. यावरुन ही मिळकत पंचायतन संस्थानच्या मालकीची आहे त्यामुळे या जागेवर कोणत्याही योजना आखण्यात येऊ नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा पटवर्धन यांनी दिला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीFamilyपरिवार