शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

मिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस प्रारंभ, दर्गा उरूसानिमित्त आयोजन : श्रोत्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:27 IST

मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.

ठळक मुद्देमिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस प्रारंभदर्गा उरूसानिमित्त आयोजन : श्रोत्यांची गर्दी

मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.दर्गा आवारातील चिंचेच्या झाडाखाली संगीतरत्न अब्दुल करीम खाँ संगीत सभेच्या सकाळी पहिल्या सत्रात शास्त्रीय गायनास श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला. दर्गा संगीत सभेचा प्रारंभ समीर अभ्यंकर (पुणे) यांच्या गायनाने झाला.

अभ्यंकर यांनी राग देवगंधार आळविला. विलंबित एकतालात रईन के आगे पिहरवा द्रुततालात लाडली बनावत आया हा विलंबित ख्याल त्यांनी सादर केला. त्यांना माधव मोडक यांनी तबलासाथ, तर अजित पुरोहित यांनी हार्मोनियम साथ केली.

सहदेव झेंडे (कवलापूर) यांनी राग बैरागी आळविला. विलंबित एकतालात जागोरे नंदलाल, द्रुत त्रितालात मोरा संदेशवा  या चीजा सादर केल्या. त्यांना वीरेश संकाजे यांनी तबलासाथ व संदीप गुळवणी यांनी तानपुरा साथ केली.

रईस खान (धारवाड) यांनी राग नटभैरव गायिला. विलंबित एकतालात रसिया मोरा, द्रुत एकतालात बेग बेग आयो मंदिर या चीजा त्यांनी गायिल्या. त्यांना सागर सुतार यांनी तबला साथ, मनोज जोशी यांनी हार्मोनियम साथ व संदीप गुळवणी यांनी तानपुरा साथ केली.

प्रसन्न गुडी (मुंबई) यांनी राग कोमल रिषभ आसावरी गायिला. तीनताल मध्यलयीत मै तो तुमरे दास जनम जनम ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यांना दादा मुळे यांनी तबला साथ, अजित पुरोहित यांनी हार्मोनियम साथ व नुरमहंमद उगारे यांनी तानपुरा साथ केली.रात्री दुसऱ्या सत्रात गायन-वादन व जुगलबंदीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत रंगला. दर्गा सरपंच अब्दुल अजीज मुतवल्ली, बाळासाहेब मिरजकर, मोहसिन मिरजकर, मजीद सतारमेकर यांनी संयोजन केले. अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस श्रोत्यांची मोठी गर्दी होती.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली