शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Sangli: धनादेश न वटल्याने शिक्षा, मिरजेतील महिलेला तब्बल साडेदहा लाखांचा दंड

By संतोष भिसे | Updated: March 4, 2025 14:24 IST

१० महिन्यांचा तुरुंगवास

सांगली : धनादेश न वटल्याने मिरजेतील महिलेला १० महिन्यांचा तुरुंगवास आणि तब्बल १० लाख ६५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. फरजाना शहाबुद्दीन पीरखान (रा. किल्ला भाग, मिरज) असे तिचे नाव आहे. सांगली येथील आठवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभांगी नलवडे यांनी सोमवारी (दि. ३) हा निकाल दिला.खटल्याची माहिती अशी : महेश फिरोजी खोत यांनी मिरजेतील गुलमोहर कॉलनीत मनीषा अपार्टमेंटमध्ये सदनिका खरेदीसाठी फरजाना पीरखान यांच्यासोबत करार केला होता. त्यासाठी अनामत स्वरुपात काही रक्कम फरजाना यांना दिली होती. कालांतराने काही कारणांनी हा करार रद्द झाला. त्यामुळे फरजाना यांनी ही सदनिका अन्य ग्राहकाला विकली. करार रद्द झाल्याने खोत यांना पैशांची परतफेड व नुकसान भरपाईपोटी ६ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासाठी फरजाना यांनी खोत यांना धनादेश दिला.पण हा धनादेश बॅंकेतून न वटता परत आला. खोत यांनी फरजाना यांच्याकडे पैशांसाठी पाठपुरावा करुनही त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दाव्याचा निर्णय देताना न्यायालयाने फरजाना यांना तुरुंगवास व दंडाची शिक्षा ठोठावली. खोत यांच्यावतीने ॲड. चिराग सोनेचा यांनी काम पाहिले.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय