मिरज : एमपीएससीच्या परीक्षेवरून अमरावतीचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल मिरज तालुका शिवसेनेतर्फे राणा यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी राणा यांच्या पोस्टरला चप्पल मारून रोष व्यक्त केला.
एमपीएससीच्या मुद्द्यावरून आमदार रवि राणा यांनी फेसबुकवर लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केली हाेती. त्यांच्या विधानाबद्दल शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. मिरजेत तालुकाप्रमुख विशालसिंह रजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चाैकात शिवसैनिकांनी रवि राणा यांचा निषेध करीत घोषणा दिल्या. यावेळी तानाजी सातपुते, गजानन मोरे, किरणसिंग रजपूत, विजय शिंदे, संजय काटे, महिला आघाडीच्या रुक्मिणी आंबिगेर, सुहाना नदाफ, सरोजिनी माळी, महादेवी केंगार, सुनंदा माने, शकिरा जमादार, चंद्रकांत मैगुरे, बबन कोळी, महेश लोंढे, महादेव हुलवान उपस्थित होते.