शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली  : पांडुरंग कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:52 IST

RoadSefty, Sangli, Muncipal Corporation, Miraj मिरज शहरात अमृत पाणी योजनेमुळे अनेक रस्ते उखडले होते. या रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली असून महिन्याभरात खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी मंगळवारी सांगितले.

ठळक मुद्देमिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न महिन्याभरात निकाली  : पांडुरंग कोरे पॅचवर्कसाठी कायमस्वरूपी यंत्रणा

सांगली : मिरज शहरात अमृत पाणी योजनेमुळे अनेक रस्ते उखडले होते. या रस्त्यांची कामे आता हाती घेण्यात आली असून महिन्याभरात खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी मंगळवारी सांगितले.

महापालिकेकडून कायमस्वरूपी पॅचवर्कची यंत्रणाही उभारली जाणार असून त्यासाठी दीड कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.महापालिकेच्या स्थायी समितीची सभा साडेतीन महिन्यांनंतर झाली. त्यानंतर कोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अमृत योजनेमुळे मिरज शहरातील अनेक रस्ते उकरण्यात आले होते. त्यामुळे दीड वर्ष नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

आता योजनेचे काम पूर्ण होत आले असून पाईपलाईनसाठी उकरलेल्या रस्त्यांची दुरुस्तीही हाती घेतली आहे. सध्या सहा कोटीची रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. ही कामे सुरू झाली आहेत.

याशिवाय नगरसेवकांचा स्थानिक निधी, जिल्हा नियोजन समितीतूनही रस्त्यांची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या असून येत्या महिन्याभरात खराब रस्त्यांचा प्रश्न निकाली निघेल.महापालिका क्षेत्रात रस्त्यांवरील खड्डे मुजविण्यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. यंदा पॅचवर्कची कामे महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅचवर्कसाठी मजूर व साहित्य पुरवठ्याच्या निविदांना मंजुरी दिली आहे.

याशिवाय रोडरोलर व इतर यंत्रसामग्रीही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे बाराही महिने खड्डे मुजविण्याचे काम सुरू राहील. त्यासाठी दीड कोटी खर्चासही स्थायी समितीत मंजुरी दिल्याचे कोरे यांनी सांगितले.पाणी पुरवठ्यावर अधिकारी धारेवरनदीपात्रात मुबलक पाणी असूनही शहरात पाणीपुरवठ्याचा ठणठणाट आहे. पाईपलाईन खराब झाल्याने जागोजागी गळती होते. रबर ट्यूब गुंडाळून त्या काढण्याचा फार्स केला जातो, असा आरोप मंगेश चव्हाण यांच्यासह सदस्यांनी केला. यावर सभापती पांडुरंग कोरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत, तात्काळ आराखडा करण्याचे आदेशही दिले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाmiraj-acमिरज