शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये शवागार बंद; मृतदेहांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:40 IST

मिरज : मिरज सिव्हिल रुग्णालयात रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असून, शवागार गेले चार महिने बंद आहे. यामुळे सामान्यांची फरफट होत ...

मिरज : मिरज सिव्हिल रुग्णालयात रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असून, शवागार गेले चार महिने बंद आहे. यामुळे सामान्यांची फरफट होत आहे. रुग्णालयात अतिदक्षता, नवशिशू विभाग, शीत शवगृह व शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्याची मागणी मिरज सुधार समितीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्ययावत नसल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आहे. फ्रिजर बंद पडल्याने शीत शवगृह बंद आहे. यामुळे मृतदेह खासगी रुग्णालयात ठेवावे लागत आहेत. मृतदेह चार तासांत विघटन होण्यास सुरुवात होत असल्याने मृतांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. शवविच्छेदन विभाग अद्ययावत नाही, रुग्णालयात औषधांचा व रेबीज इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.नवशिशू विभागालगत प्रसूत मातांना राहण्यासाठी जागा नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना अरेरावी व मारहाणीचे प्रकारही होत आहेत. मिरज शासकीय रुग्णालयातील असुविधांबाबत स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन प्रकाश आबिटकर यांनी मिरज सुधार समितीला दिले.यावेळी आमदार सुरेश खाडे यांच्यासह मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, जहीर मुजावर उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटल