शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मिरजेत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद--संशयित सोलापूरचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:32 IST

सांगली : मिरजेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या माळशिरस (जि. सोलापूर) येथील सहाजणांच्या टोळीस पकडण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना मंगळवारी पहाटे यश आले

ठळक मुद्देघातक शस्त्रे जप्त; शिरगुप्पीमधील एका घरफोडीचा छडा पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. तदरवाजाचे कुलूपही त्यांनी गायब केले

 लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मिरजेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या माळशिरस (जि. सोलापूर) येथील सहाजणांच्या टोळीस पकडण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना मंगळवारी पहाटे यश आले. या टोळीकडून शिरगुप्पी (ता. अथणी) येथील एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. त्यांच्याकडून विळा, सुरा या घातक शस्त्रांसह स्क्रू-ड्रायव्हर, पाने, एक टेम्पो असा दोन लाखाचा माल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक केलेल्यांमध्ये भास्कर साहेबराव शिंदे (वय ४०), अण्णा मारुती शिंदे (३५), अंकुश मारुती शिंदे (३५), किरण अशोक जाधव (१९), संजय तुकाराम गायकवाड (३४), अजित हरिदास पवार (२२) व सुनील साहेबराव जाधव (सर्व रा. डोंबारी वस्ती, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरोडा, घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसप्रमुख शिंदे यांनी गस्त घालण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिस अधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस फौजदार कुलकर्णी व हवालदार नदाफ हे मंगळवारी पहाटे मिरजेतील उत्तमनगर परिसरात गस्त घालत होते. त्यांची दुचाकी खराब झाल्याने ते दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी टोळीतील दोन संशयित पाठीवर सॅक अडकवून संशयितरित्या फिरताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना बोलाविले, पण ते पळून गेले. त्यामुळे कुलकर्णी व नदाफ यांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. त्यांच्या सॅकची झडती घेतल्यानंतर एक सुरा, विळा, लोखंडी पाईप, स्क्रू-ड्रायव्हर, पाने, सहा हजार नऊशे रुपयांची चिल्लर असा माल त्यात सापडला. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. तसेच आणखी चार साथीदार याच परिसरात टेम्पोत बसल्याची माहितीही दिली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून कुलकर्णी व नदाफ यांनी पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे व सहाय्यक निरीक्षक पी. डी. कांबळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पिंगळे यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम राबवून टोळीतील आणखी चौघांना पकडले. ते नंबरप्लेट नसलेल्या एका छोट्या टेम्पोत बसले होते. या टोळीविरोधात सोलापूर जिल्ह्यात काही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची माहिती घेतली जात आहे. या टोळीचे औरंगाबाद, जालना येथेही काही काळ वास्तव्य होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील दरोडे व घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी केली जात असल्याचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, महात्मा गांधी चौक ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.पुजाºयाचे घर फोडलेपोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, टोळीकडून जप्त केलेली सहा हजार नऊशे रुपयांची चिल्लर घरफोडीतील आहे. मिरजेत येण्यापूर्वी त्यांनी शिरगुप्पी (ता. अथणी) येथील एका मंदिराच्या पुजाºयाचे घर फोडले होते. त्याच्या घरातून त्यांनी ही चिल्लर चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तेथील पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. पुजाºयाचे घर फोडल्यानंतर दरवाजाचे कुलूपही त्यांनी गायब केले होते. हे कुलूप त्यांच्याकडे सापडले आहे. हाताच्या बोटांचे ठसे पोलिसांना मिळू नयेत, यासाठी त्यांनी कुलूपही गायब केले होते.पथकाला बक्षीसदरोड्याच्या तयारीतील टोळीस पकडण्यात मोलाची कामगिरी करणारे कुलकर्णी व नदाफ यांचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी कौतुक केले. त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळेच ही टोळी हाती लागली. तसेच पिंगळे व अन्य कर्मचाºयांनी तातडीने धाव घेतल्याने सर्वांनाच पकडण्यात यश आले आहे. त्यामुळे शिंदे यांनी पथकाला पंधरा हजाराचे बक्षीस जाहीर केले. गुन्हेगारी आढावा बैठकीत या पथकाचा सन्मान करुन बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.