सांगली : शहरातील हरिपूर रोड परिसरातील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळविले. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी शहर पाेलिसात याची फिर्याद दिली आहे. गुरुवार, दि. २ रोजी मध्यरात्रीच्या हा प्रकार घडला.
-----
सांगलीतून मोबाईल लंपास
सांगली : शहरातील गवळी गल्ली परिसरात घरात घुसून चोरट्यांनी मोबाईल लंपास केला. याप्रकरणी प्रज्ञा प्रभाकर वेल्हाळ (रा. नामदेव मंदिरासमोर, गवळी गल्ली, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. २८ ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्यासुमारास हा प्रकार घडला.
-------
उत्कर्षनगरमधून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील अभयनगर, हडको कॉलनी परिसरातून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल लंपास केली. याप्रकरणी शोभा परशुराम अदुके यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहेे. गुरुवार, दि. २ सप्टेंबरला मध्यरात्रीच्यासुमारास हा प्रकार घडला.