शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराकडून लग्नास नकारामुळे अल्पवयीन प्रेयसीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:24 IST

कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ ते साडेअकराच्यादरम्यान घडली. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ठळक मुद्देप्रियकराकडून लग्नास नकारामुळे अल्पवयीन प्रेयसीची आत्महत्याकवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

कवठेमहांकाळ : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ ते साडेअकराच्यादरम्यान घडली. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी संशयित प्रियकर स्वप्नील संजय पवार (वय ३०, रा. जाखापूर, ता. कवठेमहांकाळ) याच्याविरोधात अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कवठेमहांकाळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील संबंधित अल्पवयीन मुलगी तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. बुधवार, दि. १२ रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेला गेली. तिला स्वप्नील पवार याच्या गाडीवरून जाताना काहींनी पाहिले.

याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी बुधवारी रात्री तिला विश्वासात घेऊन तू कुणाच्या गाडीवरून फिरत होतीस अशी विचारणा केली. त्यावर तिने मी स्वप्नील पवार याच्या गाडीवरून फिरत होते. तो माझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगितले. यावर कुटुंबियांनी तिला समजावून सांगितले. त्याचवेळी तिने संशयित स्वप्नील यास मोबाईलवर फोन करून माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? अशी विचारणा केली. त्यावर स्वप्नीलने माझा काही संबंध नाही, मी लग्न करू शकत नाही असे सांगून फोन ठेवून दिला.यानंतर गुरुवार, दि. १३ रोजी सकाळी संबंधित मुलगी घरातून निघून गेली. कुटुंबीय तिचा शोध घेत असताना संशयित स्वप्नील व त्याचा चुलत भाऊ हे तिला गाडीवरून घेऊन गावात आले. त्यांनी मुलीने स्वप्नील पवार याच्या पोल्ट्रीमध्ये येऊन विषारी द्रव्य प्राशन केल्याचे सांगितले. यावेळी संबंधित मुलगी बेशुद्धावस्थेत होती. नातेवाईकांनी तिला तात्काळ कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली