शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांनी कान उपटले अन् फायली मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:59 IST

कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांनी कान उपटले अन् फायली मार्गीकृषी कार्यालय लागले मान मुरडून कामाला

संतोष भिसे सांगली : कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्याची चर्चा आहे.परवाने म्हणजे मलिद्याचे मोठे कुरण ठरले आहे. जिल्हाभरात सुमारे दोन ते अडीच हजार दुकाने आहेत. त्यांच्या परवान्यांची प्रक्रिया वर्षभर चालते. औषधे, खते व बियाणे अशा तिहेरी परवान्यांच्या प्रस्तावांची वार्षिक संख्या किमान सात हजारांवर जाते. वजनाविना प्रस्ताव पुढे सरकतच नसल्याचा दुकानदारांचा अनुभव आहे. खरिपाच्या हंगामात हा व्यवसाय जोमात असतो. नेमक्या याचवेळी परवान्याचे घोडे अडते. मंत्री भुसे यांनी स्वत:च सुमारे ७४० प्रस्ताव निर्गतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगून, या विभागातील खाबूगिरीवर बोट ठेवले.मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शंकर नरळे या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड  चालली. पण इतके प्रस्ताव प्रलंबित असताना वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न आता चवीचवीने चर्चेत आहे. मासिक आढावा बैठकीत बियाणे, खतांची उपलब्धता, शेततळी, हरितगृहे, शेडनेट आदींचा आढावा होतो. त्यामध्ये परवान्याच्या प्रलंबित फायलींविषयी चर्चा होत नाही काय, असाही प्रश्न पुढे येतो.गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील अनेक दुकानांवर छापे टाकण्यात आले, पण कारवाई कोणावरच झाली नाही. दुकानांचे कामकाज चोख सुरु असल्याची कृषी विभागाची सोयीस्कर समजूत झाल्याचे यातून स्पष्ट होते. 

टॅग्स :GovernmentसरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली