शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

आष्ट्यात दोन संस्थांकडून लाखोंचा गंडा

By admin | Updated: December 9, 2014 00:25 IST

गुन्हा दाखल : दुकान नोंदणी व नूतनीकरणाच्या नावाखाली फाडल्या बोगस पावत्या

आष्टा : आष्टा शहरात दुकाने नोंदणी व नूतनीकरणाकरिता माऊली फाऊंडेशन, इस्लामपूर व शिवाजी पवार दादा शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेकडून बोगस पावत्यांद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संस्थेच्या पावतीपुस्तकावर शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून खोट्या पावत्यांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध आष्टा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे आष्टा शहर अध्यक्ष प्रा. चंद्रकांत लांडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.शहरातील अनेक दुकानदार, व्यावसायिक डिसेंबर महिना असल्याने दुकानाची नोंदणी व नूतनीकरण करण्याच्या चिंतेत होते. आष्टा शहरातील दुकाने नोंदणीचे कार्यालय बंद आहे. याचवेळी इस्लामपूर येथील माऊली फाऊंडेशनच्यावतीने सरकारी नोकर असल्याचे भासवून दुकाने व नोंदणी व नूतनीकरणकरिता शहरातील दुकानदारांकडून फी वसूल करण्यात आली. आष्टा येथील ग्राहक संघटनेचे प्रा. चंद्रकांत लांडे, डॉ. सतीश बापट, वीर कुदळे व अनेक दुकानदारांना या बोगसगिरीची माहिती मिळाली. संस्थेच्या मुली शहरात फिरून ५0 रुपये घेऊन शॉप अ‍ॅक्ट लायसन्स देत असल्याचे त्यांना समजले. सर्वांनी चौकशी केली असता, ही संस्था बोगस असल्याचे शनिवारी लक्षात आल्यानंतर सांगलीचे सहायक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली, मात्र त्यांनी दखल घेतली नाही.सोमवार, दि. ८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान पालिकेच्या आनंदराव देसावळे सभागृहात शॉप अ‍ॅक्ट लायसन्स नोंदणी व नूतनीकरणाकरिता कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये सात ते आठ लोक टेबल मांडून दुकानदारांकडून ५0, १0६0, १५६0 रुपये घेऊन पावत्या देत होते. त्यांना कायदेशीर अधिकार आहे का? अशी विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सर्वांनी पोलीस उपअधीक्षक आरती बनसोडे यांना बोलाविल्यानंतर फाऊंडेशनचे क्षीरसागर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त पाटणकर व दुकान निरीक्षक संजय पटले यांच्या तोंडी आदेशानेच कॅम्प आयोजित केल्याचे सांगितले. दरम्यान, पाटणकर घटनास्थळी आले व त्यांनी हा कॅम्प बेकायदेशीर असून, आमची कोणतीही परवानगी नसल्याचे सांगितले. तपास पोलीस उपअधीक्षक बनसोडे करीत आहेत. (वार्ताहर)धनादेश वठला नाहीएका व्यापाऱ्याने महापालिकेला एलबीटीपोटी दिलेला ५0 हजार रुपयांचा धनादेश वठला नाही. त्यामुळे महापालिकेने संबंधित व्यापाऱ्याला सूचना देऊन कारवाई करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पोलीस ठाण्यासमोर गर्दी...आष्टा येथील देसावळे सभागृहात तसेच पोलीस ठाण्याला यात्रेचे स्वरुप आले होते. हजारो दुकानदार, युवक घटनास्थळी दाखल झाले होते.सहा. कामगार आयुक्तांच्यावतीने त्यांची फिर्याद घेण्याबाबत पोलिसांवर दबाव वाढत होता. परंतु हजारो नागरिकांनी कामगार आयुक्त पाटणकर व दुकान निरीक्षक संजय पटले हेच दोषी असल्याचे सांगितल्याने अखेर प्रा. लांडे यांची फिर्याद घेण्यात आली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करीत ७ आरोपींना अटक करण्यात आली.संस्थेच्या पदाधिकारी, सदस्यांवर गुन्हाआष्टा पोलिसात माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष शाम कुंडलिक क्षीरसागर (वय ४१, रा. इस्लामपूर), सदस्य संदीप शहाजी देसावळे (२६, रा. बहाद्दूरवाडी), संजय पांडुरंग गायकवाड (३८, रा. येलूर), अभिजित पांडुरंग मेढे (२०, रा. अभियंतानगर, इस्लामपूर), राहुल दादाराव डोरले (२७, रा. इस्लामपूर), विजय सर्जेराव मिसाळ (१९, रा. कामेरी), अलोक अशोक रांजवणे (२२, रा. गावराई विहिरीजवळ, कामेरी) यांच्यावर कलम ४२०, ४६५ अन्वये फसवणूक व डुप्लिकेट कागदपत्रे तयार केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.