शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Milk Supply - सांगलीतून मुंबईला पोलीस बंदोबस्तात दूधाची वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:29 IST

दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीतून मुंबईला पोलीस बंदोबस्तात दूधाची वाहतूकसाताऱ्यापर्यंत संरक्षण : लहान-मोठ्या दूध संकलनाजवळही पहारा

सांगली : दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. लहान-मोठ्या दूध संकलन केंद्राबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.  दरम्यान, सांगली जिल्ह्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले .

सांगली जिल्ह्यातही आसद, ता. कडेगांव येथे दुध उत्पादक शेतकर्‍यांला दुधाचा अभिषेक घालुन आंदोलन करण्यात आले, तर आष्टा येथे दूध गंगा गाड़ी फोडण्यात आली, तसेच तासगाव कोल्हापूर-बस फोडली. कार्यकर्त्यांनी भिलवडी परिसरात दूध संकलन बंद पाडले. सांगली जिल्ह्यातील दूधही बंदोबस्तात पोलीस दूध संघात पोहच करीत आहे. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी दूध संघ बंद ठेवावेत असे आवाहन संघांना केले आहे.

जिल्ह्यातील चितळे, हुतात्मासह वारणा, गोकूळ या दूध संघामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्याला रवाना केले जाते. सोमवारी आंदोलनाच्या पहिल्यादिवशी दूध संस्था, संकलन केंद्रे व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

दुधाचे गोरगरिबांना, शाळकरी मुलांना वाटप करण्यात आले. अनेक गावात ग्रामदैवतास दुग्धाभिषेक घालण्यात आला. पण सायंकाळी जमा झालेल्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला. या दूधाचे संकलन करण्यात आले. याची नेहमीप्रमाणे पुणे, मुंबईला वाहतूक करताना यावी, यासाठी दूध संघांना टँकरना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले.संघाजवळ सोमवारी रात्रीपासून पोलीस तैनात केले होते. मध्यरात्री व मंगळवारी पहाटे टँकरच्या दोन्ही बाजूला, पुढे-मागे संरक्षण देण्यात आले होते. साधारपणे दहाहून अधिक टँकर रवाना झाले. या टँकरना सातारा शहरापर्यंत संरक्षण दिले होते. तेथून सांगलीचे पोलीस परतले. सातारा पोलीस या टँकरसोबत पुढे गेले. कर्नाटकातून सांगलीमार्गे मुंबईला जाणाऱ्या टँकरना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी लहान-मोठ्या दूध संकलन केंद्राजवळ पोलिसांचा पहारा होता.

वाहनांची तपासणीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस दररोज रात्री रस्त्यावर थांबून संशयित वाहनांची तपासणी करतात. पण दूध आंदोलनामुळे पोलिसांना आणखी सतर्क रहावे लागले. दूध वाहतूक टँकरची मोडतोड किंवा लहान दूध व्यवसायिकांची अडवणूक होऊ नये, यासाठी सोमवारी रात्री बारानंतर शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकास थांबवून त्याची चौकशी केली. वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव व पत्ता, याची नोंद करुन घेतली. 

जिल्ह्यात दूधदर वाढीचे आंदोलन शांततेत सुरु आहे. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. मी स्वत: इस्लामपूरसह काही गावातातील दूध संस्थांना भेटी देऊन पाहणी केली. दूध रस्त्यावर ओतून देऊ नये, त्याचे संकलन व्हावे, यासाठी लहान-मोठ्या दूध संकलन केंद्रांना पोलीस संरक्षण दिले आहे. मुंबईकडे दूध वाहतूक करणाऱ्या टँकरना आंदोलन सुरु राहिपर्यंत संरक्षण दिले जाईल.- सुहेल शर्मा, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSangliसांगली