शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्थलांतरित पक्ष्यांनी कृष्णाकाठ गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:02 IST

थंडीचा महिना सुरू झाला की कृष्णाकाठचे पाणवठे परराज्यातून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांनी फुलतात. महापुरानंतर वातावरणात झालेल्या बदलाने महिनाभर थंडी पुढे गेली, मात्र थंडीस प्रारंभ होताच तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, असे पाणथळीचे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून कृष्णाकाठावर दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देस्थलांतरित पक्ष्यांनी कृष्णाकाठ गजबजलाकृष्णाकाठावरील विलोभनीय दृश्य

शरद जाधव भिलवडी : थंडीचा महिना सुरू झाला की कृष्णाकाठचे पाणवठे परराज्यातून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांनी फुलतात. महापुरानंतर वातावरणात झालेल्या बदलाने महिनाभर थंडी पुढे गेली, मात्र थंडीस प्रारंभ होताच तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, असे पाणथळीचे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून कृष्णाकाठावर दाखल झाले आहेत.स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींना लागलेली असते. एक महिना उशिरा का होईना, तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी या पक्ष्यांच्या जोडीने खुल्या चोचीचे करकोचे, पांढऱ्या मानेचे करकोचे, रंगीत करकोचे, गोताखोर, अवाक, चमचे, सुरय, स्थानिक स्थलांतरित पक्षीही कृष्णाकाठावर लक्ष वेधत आहेत.हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशात बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती, कीटक बर्फाखाली गाडले जातात. परिणामी या ठिकाणाहून पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित अशा ठिकाणांच्या शोधात कृष्णाकाठी स्थलांतरित होतात. कृष्णा नदीकाठी उसाच्या पिकात असणारे असंख्य प्रकारचे कीटक व नदीतील मासे हे या पक्ष्यांचे प्रमुख व आवडीचे अन्न आहे.

नदी पात्रात असणाऱ्या बंधाऱ्याच्या खाली पाणी कमी असल्याने कीटक, छोटे मासे असे भक्ष्य पक्ष्यांना सहज सापडते. सँन्ड पाईपर, चिखल्या, विविध प्रकारचे परीट पक्षी, नदी सुरय, टिटवी, शेकाट्या, वेडा राघू, खंड्या, रंगीत करकोचा, टिटवी, कवड्या खंड्या, पानकावळा, राखी बगळा, चक्रवाक, चमचा, मोर शराटी, चिरक किंवा काळोखी, काळ्या मानेचा शराटी, तारवाली पाकोळी, जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, मुनिया आदी पक्षी येथे हमखास दिसतात.आपल्या किलबिलाटाने कृष्णाकाठावरील मगरीची झोप मोडण्याचे काम पक्षी करीत असल्याचे विलोभनीय दृश्यही अनेकदा पाहायला मिळते.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगली