शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिध्देवाडी परिसरातील एम.आय.डी.सी. रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 15:36 IST

मिरज येथील सिध्देवाडी येथील शासनाने प्रस्तावित केलेल्या 185 एकर जमिनीवरील औद्योगिक वसाहत रद्द करण्याचे प्रस्तावित असून याबाबत शासनस्तरावरुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

ठळक मुद्देसिध्देवाडी परिसरातील औद्योगिक वसाहत (एम.आय.डी.सी.) रद्द होणार सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांची माहिती

मिरज : मिरज येथील सिध्देवाडी येथील शासनाने प्रस्तावित केलेल्या 185 एकर जमिनीवरील औद्योगिक वसाहत रद्द करण्याचे प्रस्तावित असून याबाबत शासनस्तरावरुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.शासनाने मिरज तालुक्यातील भोसे व सिध्देवाडी या दोन गावातील सुमारे १८५ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी राखीव ठेवण्यासाठी शासनाने सन 2011 पासून निर्देशित केले होते. परंतू पुढील काळात जमीन संपादनाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सध्या या भागात म्हैसाळ या कालव्याचे काम जोरात सुरु असून या पाण्याचा उपयोग या भागातील पडीक जमिनी बागायत किंवा फळबाग लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे. बरीच वर्षे पाण्यापासून वंचित असणारा हा भागा आता पाण्याखाली येणार आहे. या भागातील प्रस्तावित ही औद्योगिक वसाहत रद्द करावी असा ठराव ग्रामपंचायतीने पास करुन शासनास कळविले होते.या संदर्भात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे तसेच एम.आय.डी.सी. अधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री खाडे म्हणाले, शासनाच्या विचाराधीन असलेल्या या एम.आय.डी.सी. बाबत ग्रामपंचायतीने जो ठराव पास केला आहे, त्याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.या भागातील आमदार म्हणून शासनाकडे सतत या बाबत पाठपुरावा केला होता.

या निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे याबद्दल मुख्खमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच  उद्योगमंत्री सुभाष देसाई याचे अभार मानले या बैठकीत  सुभाष देसाई यांनी निर्देश दिले आहेत की या भागातील सर्वे लवकर करून याची मागणी मान्य करण्याबाबत त्वरीत कारवाई करावी.

टॅग्स :ministerमंत्रीMIDCएमआयडीसीSangliसांगली