शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या पाणी वापर संस्थांसाठी न्यायालयात : अजितराव घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:51 IST

सांगली : म्हैसाळ योजने चे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढकल सुरू असून, या प्रश्नावर आता उच्च न्यायालया त याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री ...

ठळक मुद्देश्रेयासाठी पाणी लांबत असेल, तर अ‍ॅडव्हान्समध्ये नारळ फोडून घ्या

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढकल सुरू असून, या प्रश्नावर आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत दिला.

दरम्यान, पाण्याचे श्रेय घेण्यासाठीच जर पाणी लांबविले असेल, तर अ‍ॅडव्हान्समध्ये नारळ फोडून घ्या. मात्र, शेतकºयांच्या भावनेशी खेळू नका, असे आवाहनही त्यांनी केले.घोरपडे म्हणाले की, १८ हजार कोटी रूपये खर्च झालेल्या म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण झाले, तर सहा लाखांवर हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बेरोजगारीचे प्रमाण ल क्षात घेता, पाण्यामुळे युवकांना चांगला रोजगार उपलब्ध होणार असताना, केवळ योग्य नियोजन केले नसल्याने आवर्तन लांबवून शेतकºयांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले आहे.

म्हैसाळ योजना चांगल्या पध्दतीने चालू ठेवायची असल्यास पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, कारण नसताना पाणी वापर संस्था स्थापण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकºयांना सहभागी करून घेतल्यास नियोजन सोपे होणार असल्याने, आता पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत.

पाणी वापर संस्थांच्या बांधणीसाठी राजकीय डावपेचातून अधिकाºयांकडून चालढकल सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही पर्याय निर्माण करा, मात्र पाण्याचे नियोजन करा, हीच आमची भूमिका असताना, यात राजकारण आणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी फळ मार्केटचे सभापती दीपक शिंदे, भारत डुबुले, जीवन पाटील, आबासाहेब पाटील, शंकरराव गायकवाड आदी उपस्थित होते.श्रेय घ्या, पण शेतकऱ्याला पाणी द्याघोरपडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेची संपूर्ण उभारणीच आपल्यासमोर झाल्याने व म्हैसाळपासून ते जतपर्यंत समोर उभे राहून कालव्यांची कामे करून घेतल्याने, मला कोणत्याही श्रेयाची गरज नाही. केवळ पाण्याचे श्रेय  घेण्यासाठी म्हणून जर पाणी लांबविले जात असेल, तर हे चुकीचे असून शेतकºयांच्या भवितव्याशी खेळले जात आहे. पाण्याचे श्रेय कुणीही घ्यावे, मात्र या भागाला पाणी द्यावे.म्हैसाळ योजनेला केंद्र सरकारच्या योजनेतून निधी मिळत आहे ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी, योजनेच्या प्रशासनाकडून चालू असलेले नियोजन पाहता वर्षभरात योजना पूर्ण होईल, असे वाटत नाही, असेही घोरपडे म्हणाले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली