शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

म्हैसाळ योजना वसंतदादा कारखाना चालविणार

By admin | Updated: June 2, 2016 01:14 IST

जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव : सुरुवातीला कळंबीपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंतच्या योजनेसाठी आग्रही

 सांगली : शासनाकडून ज्यापद्धतीने धडक योजना ताब्यात घेऊन यशस्वीपणे कारखान्याने चालविल्या, त्याचपद्धतीने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हैसाळ योजना चालविण्यासाठी उत्सुक आहे. सुरुवातीला दुसऱ्या टप्प्यापर्यंतची म्हैसाळ योजना चालविण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेचा जेवढा वार्षिक खर्च आहे, तो आम्ही करण्यास तयार आहे. जेवढ्या योजनेची जबाबदारी कारखाना घेईल, तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून वसुली होईल. अन्य पिके व बागा असणाऱ्यांकडूनही वसुलीसाठी प्रयत्न केले जातील. ही योजना कारखान्यामार्फत चालविली गेली, तर योजनेच्या परिसरात किमान आठ हजार हेक्टर क्षेत्रात उसाचे जादा उत्पादन होऊ शकते. त्यामुळे कारखान्याला जादा ऊस मिळेल, शिवाय तो अन्य कारखान्यांसाठीही उपलब्ध होईल. त्यामुळे कारखान्याला हा फायदा होईल आणि योजनेच्या बिलाचे त्रांगडेही दूर होणार आहे. ही योजना बारमाही सुरू राहू शकते. सुरुवातीला दोन टप्प्यांपुरती आमची तयारी आहे. त्यानंतर पुढील सर्व टप्प्यांची जबाबदारी स्वीकारून कारखाना संपूर्ण योजनाच चालविण्यास घेऊ शकते. दुसऱ्या टप्प्यापर्यंतचे वीजबिल स्वतंत्र करावे, अशा मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला आहे. कारखान्यामार्फत ही योजना यशस्वीपणे चालविली जाऊ शकते. यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात जे शेतकरी वसंतदादा कारखान्यास ऊस घालतील, त्यांच्या योजनेचे संपूर्ण बिल कारखाना भरेल. वसंतदादा कारखाना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही या योजनेच्या माध्यमातून बदल घडवू. टेंभू योजनेचा काही भागही चालविण्यासाठी कारखाना तयार आहे. शासन निर्णयावर सर्व अवलंबून आहे. (प्रतिनिधी) शंभर वसंत बंधारे : उपक्रम राबविणार यंदा वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात शंभर वसंत बंधारे उभारण्यासाठी वसंतदादा कारखाना पुढाकार घेणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्या फंडातून काही कामे करावी लागतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न चालू झाले आहेत. कारखाना या उपक्रमासाठी पुढाकार घेणार आहे. समाजातील अन्य घटकांची मदत यासाठी घेतली जाणार आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. असे आहे आर्थिक गणित कारखान्याच्या जवळच्या भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून उसाची मोठी उपलब्धता झाली, तर बाहेरील जिल्ह्यातील प्रतिटन दोन हजार रुपये अतिरिक्त खर्च करून ऊस आणण्याची वेळ येणार नाही. यातून कारखान्याचे सुमारे सहा कोटी रुपये वाचणार आहेत. दुसरीकडे सध्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च योजना चालविण्यासाठी येणार आहे. शेतकऱ्यांवर बंधन नाही योजना चालविताना ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, पीक कोणते घ्यावे, याबाबतचे कोणतेही बंधन नसेल, मात्र वसंतदादा कारखान्याला ऊस दिल्यास त्याचा आर्थिक फायदा त्यांना होणार आहे. याशिवाय आगाऊ पैसे भरावे लागणार नाहीत.