शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

म्हैसाळ योजना मार्चपासून सुरू :दुरुस्ती पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:05 IST

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.

ठळक मुद्देजत, कवठेमहांकाळ तालुक्यातून पाण्याची मागणी

मिरज : पाण्याला मागणी नसल्याने यावर्षी जुलैपासून तब्बल आठ महिने बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना मार्चपासून सुरू होणार आहे. योजनेच्या आरग, सलगरे, बेडग व कवठेमहांकाळ परिसरात कालव्याची गळती काढण्याचे व अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यासाठी जत व कवठेमहाकांळ तालुक्यातून पाण्याची मागणी होत आहे.

गतवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू असताना, योजनेच्या सहा टप्प्यातील तब्बल ९५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर एप्रिलपासून ७ जुलैपर्यंत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व शेतीसाठी १५४ दिवसांत सुमारे ७ टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला. जुलै महिन्यात आवर्तन बंद झाल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत चांगल्या पावसाने तीनही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाली.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे लागते, मात्र यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तीनही तालुक्यातून पाण्याची मागणी नसल्याने योजना सुरू करण्यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. योजना आठ महिने बंद असल्याने आरग, बेडग व सलगरे मुख्य कालव्याची गळती काढण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात आली. १ मार्चपासून योजना सुरू करण्याच्या हलचाली सुरू असून, त्यासाठी आरग, बेडग कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. कालव्यांचे अस्तरीकरण व व्हॉल चेंबर्स बसविण्यात आल्याने पाण्याची गळती कमी होणार असल्याचे म्हैसाळच्या अधिका-यांनी सांगितले.

कालव्यांच्या अस्तरीकरणामुळे योजना दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवणे शक्य होणार असून, गळतीमुळे वाहून जाणा-या पाण्याची बचत व कालव्यालगतच्या शेतक-यांचे अतिरिक्त पाण्यामुळे होणारे नुकसान वाचणार आहे.मागणी नसल्याने आवर्तन रखडलेम्हैसाळ योजनेच्या गतवर्षीच्या आवर्तनाचे थकीत विजबिल सुमारे ३२ कोटी रुपये व पाणी बिलाची थकबाकी सुमारे ३० कोटी रुपये आहे. ६० कोटी रुपये थकबाकी असल्याने यावर्षी आवर्तन सुरू करण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून वसुली करावी लागणार आहे. मात्र योजनेचा विद्युतपुरवठा खंडीत नसल्याने १ मार्चपासून सुरू झालेले आवर्तन पावसाळा सुरू होईपर्यंत चालणार आहे. टेंभू व ताकारी योजना महिन्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. मात्र पाण्यासाठी शेतकºयांची मागणी नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले होते.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली