शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

म्हैसाळ उपसा सिंचन योजना अनिश्चिततेच्या गर्तेत

By admin | Updated: February 9, 2016 00:15 IST

पाणीपट्टीबाबत विचार करण्याची गरज : मिरज तालुक्यात राजकीय समन्वयाचा अभाव

अमोल शिंदे -- एरंडोली --म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. म्हणून पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकरी टाळाटाळ का करतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. दुष्काळाचा कलंक किमान मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यावरून पुसण्यातील म्हैसाळ योजनेचे योगदान कोणीही नाकारणार नाही. वसंतदादा पाटील व विठ्ठल दाजी पाटील यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात साकारत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी आणला. तासगाव, कवठेमहांकाळ मतदार संघाच्या रचनेनंतर आर. आर. आबा यांनी म्हैसाळ योजनेतून नियमित पाणी सोडण्याबाबत दक्षता घेतली. जिल्ह्याच्या राजकारणात गेली २५ वर्षे महत्त्वाचा भाग असणारी ही योजना, आजही अनिश्चिततेत अडकली आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप या सत्ताधारी नेत्यांवर आता ही योजना नियमित चालविण्याची जबाबदारी आली आहे. पण नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. म्हैसाळ योजनेच्या पुढील कामासाठी ३२ कोटी मंजूर झाले. पण हजारो कोटी खर्चून निर्माण झालेली ही योजना, पाणीपट्टी भरली नाही म्हणून बंद आहे. सध्या ऐन थंडीतच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, तर येणारा उन्हाळा किती भीषण असेल, याच चिंतेत शेतकरी आहेत. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी नाही, या भाजप सरकारच्या भूमिकेने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. संकाटात असलेला शेतकरी व पशुधन वाचविणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मोठ्या उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज सरकार देते, पण शेतकऱ्यांना मात्र मदत देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे सक्तीने वसूल करत आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा म्हणणारे, आज सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांना हे आपले सरकार वाटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावाच नाहीपाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्यावरून नेहमीच आग्रह धरला जातो. पाणी एकदा आले की परत याचा पाठपुरावा ‘पाटबंधारे’च्या कृतिशील कर्मचाऱ्यांकडून होत नाही, असा शेतकऱ्यांना असलेला पूर्वानुभव हाच पाणीपट्टी वसुलीतील सर्वोच्च अडसर ठरतोय.प्रत्येक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी पेटत असून, पाणी तर येणारच, पण जितका वेळ त्याला होणार आहे, तितके अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. पाण्यासाठी आंदोलनात पुरोगामी संघटना, कर्नल सुधीर सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख हे नेते पुढे येत असताना, आमदार सुमनताई पाटील यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन का? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.पोटकालव्यांची रखडलेली कामे‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका पाणी आल्यानंतर त्याच्या वाटपाचे विस्कळीत नियोजन, आवर्तनाची अनिश्चिततापाण्याची कालव्यांतून होणारी भरमसाट गळतीपाणीपट्टी भरण्याविषयीची नकारात्मक मानसिकता