शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’ योजनेचे कर्मचारी संपावर; सांगली जिल्ह्यातील दहा हजार मजुरांची उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:19 IST

रोपवाटिका सुकल्या, शेतीचे कामे ठप्प

प्रदीप कुलकर्णीजत : ‘मनरेगा’ योजनेचे कर्मचारी २७ जानेवारीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे पाच दिवसांत जिल्ह्यातील कामे बंद पडली, याचा किमान १० हजारहून अधिक मजुरांना फटका बसला आहे. यामुळे शेतीची कामे, सामाजिक वनीकरणातील रोपवाटिका, रोपलागवड आदी कामे ठप्प पडली आहेत. या संपामुळे रोजगार हमी योजनेची सर्व कामे बंद आहेत.फेब्रुवारी महिना सुरू झाल्याने शेतातील कामे कमी झाली आहेत. काही दिवसांनी द्राक्षाचा हंगाम संपणार आहे तर स्थलांतरित झालेले हजारो ऊसतोड मजूर घराकडे परततील, अशा वेळी मजूर मोठ्या आशेने ‘रोहयो’च्या कामांकडे वळतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मस्टर काढण्यापासून ते मोजणीपर्यंतची सर्व कामे थांबली आहेत.जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागातील मजुरांना तातडीने मनरेगा योजनेचे काम उपलब्ध न झाल्यास स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी स्थिती आहे. संपामुळे वैयक्तिक लाभार्थी यांची कामे अर्धवट स्थितीत असून, त्यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

रोपवाटिका सुकल्या, शेतीचे कामे ठप्प‘राहयो’तून घरकुल, फळबागा, रस्ते, विहिरी, जनावरे गोठा आदी कामे सुरू होती. जिल्ह्यात मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे फळबागा व विहिरींची कामे बंद झाल्याने सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका व वृक्षलागवड कामांना बसला आहे. या ठिकाणी वृक्षलागवड कामांवर दररोज मजूर असणे आवश्यक आहे. मात्र, संपामुळे मजुरांचे मस्टर निघत नाही. त्यामुळे मजुरांनी कामावर येणे बंद केले आहे. अशा परिस्थितीत रोपांचे व वृक्षलागवडीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

यासाठी सुरू आहे आंदोलनराज्यातील साडेचार हजार रोजगार हमीवरील कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करीत आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेत समायोजन करावे, सर्व अधिकारी, कर्मचारी यांची एस-२ इन्फोटेक कंपनीमार्फत होणारी अनधिकृत व अवैध भरती प्रक्रिया तत्काळ थांबवावी आणि एस-२ इन्फोटेक कंपनी रद्द करून त्याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन (सोसायटी)मार्फत नियुक्ती देऊन समान काम समान वेतन धोरण लागू करण्यात यावे, इतर विभागाप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतिबंध तयार करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.आंदोलनातील सहभागीजिल्हा एमआयएस समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक, क्लर्क कम-डाटा एन्ट्री ऑपरेटर, वाहनचालक संघटना महाराष्ट्र राज्य असे राज्यातील साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : MNREGA workers' strike in Sangli leaves thousands jobless, hungry.

Web Summary : A strike by MNREGA workers in Sangli district has left over 10,000 laborers jobless and facing potential starvation. Key works are halted, impacting agriculture, forestry, and individual beneficiaries. Workers demand fair treatment, regularization, and an end to unfair hiring practices.