शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

माधवनगरात आठवणी यंत्रमाग धडधडीच्या

By admin | Updated: June 22, 2016 00:07 IST

नियोजनबद्ध निर्मिती : सांगलीला पर्याय असलेल्या व्यापारीपेठेचे होणार काय?, नागरी सुविधांची प्रतीक्षा कायम --बदलते माधवनगर-१

सांगली शहरालगतचे माधवनगर म्हणजे एकेकाळची मोठी व्यापारीपेठ. सांगलीस पर्यायी व्यापारीपेठ म्हणूनच हे गाव वसवले गेले. ते वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्रही बनले. मात्र काळाच्या ओघात हे नियोजनबद्धरित्या वसवलेले गाव बदलत गेले. नागरीकरण वाढले, गावाचा विस्तार चारही दिशांनी झाला, पण समस्याही वाढल्या. व्यापारीदृष्ट्या उद्ध्वस्त होणाऱ्या या गावाने मागील दहा वर्षांत पुन्हा उभारी घेतली. मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. या सगळ्या स्थित्यंतराचा मागोवा घेणारी ही मालिका...गजानन साळुंखे ल्ल मधवनगरमाधवनगर या उद्योगी व व्यापारी गावाची निर्मिती सांगलीस पर्यायी बाजारपेठ म्हणून झाली. तत्कालीन सांगली संस्थांनामध्ये व्यापारी वर्गावर अन्यायी निर्णय लागू केल्याने १९४५ च्या आसपास माधवनगरची स्थापना बुधगावकर संस्थानचे तत्कालीन माधवरावअधिपती पटर्वधन यांच्या पुढाकाराने झाली. व्यापारीवर्गाला पर्यायी बाजारपेठ वसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देतानाच सोयी-सवलतीही दिल्या आणि माधवराव पटवर्धन यांच्या नावावरून माधवनगर असे गावाचे नामकरण झाले. या माधवनगरने व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. कापड उद्योगात माधवनगरचे नाव आजही देशभरात आदराने घेतले जाते.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि माधवनगर या दोन्ही गावात प्रचंड साम्य आहे. जयसिंगपूरच्या धर्तीवर अभ्यास करून माधवनगर वसवण्यात आले. पाच ते दहा हजार चौरसफुटांचे प्लॉट, मागील बाजूस गोदामाची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी आड (विहीर), पुढील बाजूला राहण्यासाठी घर, समोर प्रशस्त रस्ते, जागेच्या मागील बाजूस सांडपाणी व मैलविसर्जनासाठी अरूंद बोळ, प्रत्येक गल्लीत खुली जागा, पूर्व-पश्चिम व्यापारी पेठा अशी रचना होती. पुढे त्यांना आठवड्यातील सात वारांची नावे देण्यात आली. ती तशीच आहेत. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी काकडवाडी येथून चिनी मातीच्या वाहिन्यांची व विशेष तंत्रज्ञान वापरून सायफान पद्धतीने सोय करण्यात आली होती. १९५४ मध्ये माधवनगर ग्रामपंचायतीची स्थापना होऊन देवकरण मालू ऊर्फ बार्शीकर शेठजी पहिले सरपंच झाले. शेतकरी कामगार पक्ष, कॉँग्रेस, जनसंघ आणि कामगार संघटना आदी पक्ष पहिल्यापासूनच सक्रिय राहिले. गावाती शेतीयोग्य जमीन अल्प आहे. गावाच्या मध्यभागी रेल्वे स्थानक होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर होई. त्याचा कापड उद्योगाला फायदा झाला. काळाच्या ओघात येथील रेल्वे बंद झाली व गावाच्या बाहेरून नवीन रेल्वेमार्ग सुरू झाला. मात्र गावाच्या विकासासाठी त्याचा संबंध कमी राहिला आहे.गंगाधर लक्ष्मण नातू यांनी १९४४ मध्ये दि माधवनगर कॉटन मिलची स्थापना केली. या मिलची ओळख जिल्ह्याचे भूषण अशीच होती. आसपासच्या पंधरा गावाच्या विकासात कॉटन मिलचा सिंहाचा वाटा राहिला. त्यासाठी बुधगावकर पटवर्धन सरकारने जागा उपलब्ध करून दिली. या मिलमध्ये त्याकाळी अडीच हजार कायम कामगार होते. तेवढेच कंत्राटी कामगारही होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील बेरोजगार माधवनगरात रोजगारासाठी आले आणि येथेच स्थायिक झाले. या मिलने कुशल कामगार कापड उद्योगास दिले. सलग २५ वर्ष ही मिल अतिशय उत्तम पद्धतीने चालली. हा काळ माधवनगर व इतर गावाबरोबर या परिसरातील ग्रामस्थांच्या जीवनातील उत्कर्षाचा काळ ओळखला जातो. राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला होता. मिलमधून उत्पादित होणारा पक्का माल अनेक नामवंत कापड कंपन्यांना दिला जात असे. जागतिक कापड बाजारात माधवनगरची स्वतंत्र ओळख त्यामुळे निर्माण झाली होती. त्याचवेळी गावात यंत्रमागाने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले.गावातील कोणत्याही घरात पहावे तेथे यंत्रमाग दिसत होते. यंत्रमागाच्या धडधडीची गावाला सवय झाली होती. अनेकांची रोजीरोटी यंत्रमागावर चालली होती. आज त्या आठवणी केवळ चर्चेपुरत्या राहिल्या आहेत... (क्रमश:)कॉटन मिलचे योगदान माधवनगर कॉटन मिलमुळे गावातील परिसर नेहमी गजबजलेला असे. सर्व प्रकारच्या सोयीसवलती मिलने कामगारांना व ग्रामस्थांना दिल्या. मिलमधून मिळणाऱ्या आर्थिक महसुलातून ग्रामपंचायत संपूर्ण गावाला वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा पुरवत असे. मिलच्या अस्तित्वामुळे अनेक लहान-मोठे उद्योग-व्यवसाय येथे उभे राहिले. मिलमुळे वेगळी बाजारपेठच माधवनगरला वसली होती.