शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सभेत सभासदांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:53 IST

दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ लाख रुपयांच्या उधळपट्टीवरून सभासदांनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देदि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सभेत सभासदांचा संतापसभेत सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील उधळपट्टीचा विषय उपस्थित

सांगली : दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ लाख रुपयांच्या उधळपट्टीवरून सभासदांनी संताप व्यक्त केला.येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात रविवारी सोसायटीच्या १0७ व्या वार्षिक सभेसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून सभासद उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष जाकीरहुसेन मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विषयपत्रिकेनुसार कामकाज सुरू झाले आणि नफातोटा पत्रक वाचनावेळी विरोधी गटाचे बजरंग कदम यांनी सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील उधळपट्टीचा विषय उपस्थित केला.

गरज नसताना येथील नूतनीकरणासाठी ४३ लाख ६८ हजार रुपये मंडळाने खर्च केले. इतका खर्च करण्याची काय गरज होती, अशी विचारणा करीत, सभासदांच्या पैशाच्या उधळपट्टीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावरून सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या या मुद्यास विरोध केला. सदस्यांत गोंधळ सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळातच नफातोटापत्रक वाचन करून मंजुरी देण्यात आली.सभासदाचा मृत्यू झाल्यास भाग, कायमठेव, जीवनरक्षक ठेवी व देय रकमा वजा करून शिल्लक कर्जाची परतफेड रिझर्व्ह फंडातून करण्याची पोटनियमातील दुरूस्ती सभेसमोर ठेवण्यात आली. कदम व डी.जी. मुलाणी यांनी त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे जुनाच पोटनियम ठेवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. सभासदाला आजारावर उपचारासाठी कल्याण निधीतून वर्षात एकदाच मदत देण्यास मंजुरी दिली. परंतु सेवानिवृत्तांचा देखील समावेश यामध्ये करण्याची मागणी डी. जी. मुलाणी यांनी केली. यासंदर्भात एक अभ्यास गट नियुक्त केला जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले. प्रत्येक सभासदाची मासिक वर्गणी एक हजार रुपये करण्यास बजरंग कदम यांनी विरोध दर्शविला. वर्गणी पाचशे रुपये करावी, अशी मागणी सभासदांनी केली.कदम यांनी विविध विषयांवर एकामागोमाग एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांनी अंतर्गत लेखापरीक्षक नियुक्ती, क्रीडा व विविध स्पर्धांवरील झालेला खर्च अशा विषयांवर हरकत घेतली. यावर संतप्त झालेल्या सत्ताधारी मंडळींनी, एकाला एकच प्रश्न विचारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावरूनही पुन्हा गोंधळ निर्माण झाला. सभेच्या पीठासनापर्यंत येऊन सदस्यांनी यावरून संताप व्यक्त करीत गोंधळातच सर्व विषय मंजूर केले. यावेळी उपाध्यक्ष शक्ती दबडे, सर्व संचालक, सचिव वसंत खांबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली