शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’मध्ये सांगली महापालिकेला सात कोटींचे बक्षीस, राज्यात दुसरा क्रमांक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:44 IST

या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार

सांगली : माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धेत अमृत गटात महापालिकेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. शासनाकडून महापालिकेला सात कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.महापौर सूर्यवंशी म्हणाले की, माझी वसुंधरा अभियानात राज्यातील ४०६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत गटात सांगली महापालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक  आला आहे. त्यासाठी सात कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. नदी, तळे व नाल्यांचे पुनर्जीवन,  सौंदर्यीकरण यासह अभियान काळात स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.पुढील स्पर्धेमध्ये महापालिका पहिल्या क्रमांक राहण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी व सामाजिक संघटना प्रयत्नशील असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे,  राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक योगेंद्र थोरात, मनगू सरगर उपस्थित होते.महापालिकेचे विशेष योगदानया यशामध्ये महापालिकेच्या आरोग्य, पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष योगदान आहे. आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धा, उपक्रम, योजना हाती घेतल्या व त्यांचे शासनाकडे सादरीकरण केले. आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सिटी समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, स्नेहलता वर्धमाने, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, वैष्णवी कुंभार, शिवम शिंदे, सिधिक पठाण, विश्वराज काटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत.

टॅग्स :Sangliसांगली