शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: हमीद इराणी, माउली जमदाडेची झुंज अखेर बराेबरीत, तब्बल एक तास चाललेली कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:57 IST

कुस्ती शाैकीनांची चांगलीच निराशा

सांगली : पैलवान हरिनाना पवार व बिजलीमल्ल संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती माउली कोकाटे (हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध इराणचा हमीद इराणी यांची कुस्ती बराेबरीत सुटली.कृष्णा काठावरील सरकारी घाटावर रविवारी महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारत विरुद्ध इराण असा सामना पाहायला मिळणार असल्याने कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी होती. पुण्यातील हनुमान आखाड्याचा माऊली कोकाटे व इराणचा हमीद इराणी यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती रंगली. तब्बल एक तास चाललेली कुस्ती रटाळ कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्त्या देखील रटाळ झाल्याने बरोबरीत सोडविण्यात आल्याने कुस्ती शाैकीनांची चांगलीच निराशा झाली.सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सरकारी घाटावरील कुस्ती मैदानावर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका व विजयंत मंडळ यांच्या विद्यमाने वज्रदेही हरीनाना पवार व बिजलीमल्ल संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापौर चषक कुस्ती मैदान आयाेजित करण्यात आले हाेते. महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष होते.

कृष्णाकाठावरील सरकारी घाट परिसरात सुमारे सात तास हे मैदान रंगले. मैदानात लहानमोठ्या शंभर कुस्त्या झाल्या. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, खा. संजय पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. प्रारंभी माऊली कोकाटे याने हमीद इराणी याच्याशी खडाखडी करुन ताकदीचा अंदाज घेतला. मात्र, दोनही पैलवान तुल्यबळ असल्याने एकमेकांना झटापट करत वेळ घालवत होते. दोघांमध्ये तब्बल एक तास रटाळ कुस्ती रंगली. यामुळे मैदानास जमलेल्या हजारो शौकिनांची निराशा झाली. अखेर पंच कमिटीने हस्तक्षेप करत कुस्ती बरोबरीत सोडवली.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती