शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मुल्य निश्चित : भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:21 IST

Coronavirus, sanglinews, MaskRate, Food and Drug administration कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य असून सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार (२ प्लाय, ३ प्लाय व एन ९५) महाराष्ट्र राज्यातील अधिकतम विक्री मुल्य महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे निश्चित केले आहे.

ठळक मुद्देमास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मुल्य निश्चित : भांडारकरजास्त रक्कम रूग्णांकडून आकारता येणार नाही

सांगली : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य असून सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार (२ प्लाय, ३ प्लाय व एन ९५) महाराष्ट्र राज्यातील अधिकतम विक्री मुल्य महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे निश्चित केले आहे.

संबंधितांनी योग्य त्या किंमतीला मास्क विक्री करावी व शासन आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) नि. प. भांडारकर यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाने मास्कच्या दर्जानुसार निश्चित केलेले अधिकतम विक्री मुल्य ((MRP per piece + GST)) रूपयांमध्ये पुढीलप्रमाणे.(1) NIOSH certified N-95 V Shape (Including Magnum N-95 V Shape mask) –19 (2) NIOSH certified N-95 3D mask (Including Magnum N-95 MH 3D mask)- 25 (3)NIOSH certified N-95 without valve (including Venus 14488 V4400-N-95 mask withoutvalve) - 28 (4) NIOS cetified N-95 cup shape mask without valve (a) Magnum N-95MH cup – 49 (b) Venus CN95 + N-95 cup shape mask without valve – 29 (c) Venus713W-N-95-6WE cup style without valve – 37 (d) Venus 723W-N-95-6RE cup stylewithout valve – 29 (5) FFP2 Mask : ISI certified (including Venus 14491 V-4420 +FFP2 mask) – 12 (6) 2 Ply surgical with loop or tie – 3 (7) 3 Ply surgical with MeltBlown (including Benus 14520-3 Ply Mask) – 4 (8) Doctors kit of 5 N-95 masks + 53Ply melt blown mask (including Venus doctors kit) – 127.शासन निर्णयानुसार विविध दर्जाच्या मास्कची विहीत केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहील. ही मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या / वितरक/किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. सर्व मास्क उत्पादक कंपन्या / वितरक/किरकोळ विक्रेते यांना मास्कचा दर्जा व त्याची निर्धारीत कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील.रूग्ण सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी रूग्णालये/नर्सिंक होम/कोवीड केअर सेंटर/डेडीकेटेउ कोवीड हॉस्पीटल इत्यादी यांना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहीत अधिकतम विक्री मुल्य मर्यादेच्या 70 टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील व खाजगी रूग्णालयांनी उपरोक्त दराने मास्कची खरेदी केल्यानंतर खरेदी किंमतीच्या 110 टक्के पेक्षा जास्त रक्कम रूग्णांकडून आकारता येणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असल्याचे  भांडारकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग