शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डफळापूरमध्ये भीषण स्फोट, दुमजली इमारत उद्ध्वस्त; कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:50 IST

मोठा अनर्थ टळला

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील मुख्य बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एक दुमजली इमारत उद्ध्वस्त झाली. दोन दुकानांसह शेजारील घराचे मोठे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाच्या आवाजाने गाव हादरले. स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी शौचालयाच्या टाकीतून मिथेन वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.डफळापूर येथील गुरुवार पेठेत मुख्य चौकात राजू मल्लाप्पा एकुंडे यांची दुमजली इमारत आहे. रात्री पती-पत्नी जेवण करून दुसऱ्या मजल्यावर झोपी गेले असताना मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास पहिल्या मजल्यावर भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की पहिल्या मजल्याला असलेले लोखंडी शटर उडून तीस फूट अंतरावर रफिक आतार यांच्या स्टेशनरी दुकानच्या शटरवर जाऊन आदळले. दोन मजली इमारतीवरील पत्रे बाजारपेठेत उडून पडले. भिंतीला तडे गेले. शौचालयाचे दरवाजे निखळून खाली पडले. पहिल्या मजल्यावरील खुर्चीने पेट घेतला. खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या दाम्पत्याला कोणतीही इजा झाली नाही. त्यांची खोली वगळता इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरासमोर स्टेशनरी दुकानाचे शटर व फर्निचर फुटल्याने मोठे नुकसान झाले. घराशेजारील अमजद आतार यांच्या इमारतीलाही तडे गेल्याने नुकसान झाले आहे. मागील बाजूस असलेल्या लक्ष्मण चव्हाण यांच्या घरावर कुंड्या आणि दगड पडून त्यांचेही नुकसान झाले.मोठा अनर्थ टळलाडफळापूर बाजारपेठेत रोज शेतकरी, ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. घटना घडलेल्या ठिकाणी बाजारपेठेचा मुख्य चौक आहे. याठिकाणी जास्त गर्दी असते. ही घटना दिवसा घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.पोलिसांचा अंदाजराजू एकुंडे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शौचालय बांधले आहे. त्यांनी आजवर एकदाही शौचालयाची टाकी रिकामी करून स्वच्छ करून घेतली नाही. बाहेर हवा जाण्यासाठी छोटी पाइप बसवली होती, ती पाइप ब्लॉक झाल्याने या टाकीतून मिथेन वायूला गळती लागून तो अचानक बाहेर पडल्याने मोठा स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दीरात्री गाढ झोपेत असलेले डफळापूरकर स्फोटाच्या मोठ्या आवाजाने जागे झाले. त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोटाचा आवाज पाच किलोमीटर अंतरापर्यंत गेला. राजू एकुंडे यांचे कुटुंबही घडलेल्या घटनेने भयभीत झाले आहे. बॉम्बस्फोट झाल्याची अफवाही काही काळ पसरली होती.

श्वान पथकाकडून शोधघटनास्थळी जत पोलिसांनी तातडीने धाव घेतली. सांगलीहून बॉम्ब शोध पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास जत पोलिस निरीक्षक सुरेश बिजली करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीBlastस्फोट