हरिपूरला विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:26 AM2021-03-19T04:26:18+5:302021-03-19T04:26:18+5:30

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील विवाहितेने गुरुवारी घरी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अविनाश वाघमारे (वय ...

Married woman commits suicide in Haripur | हरिपूरला विवाहितेची आत्महत्या

हरिपूरला विवाहितेची आत्महत्या

Next

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील विवाहितेने गुरुवारी घरी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अविनाश वाघमारे (वय २५) असे विवाहितेचे नाव असून, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूजा कुटुंबीयांसह हरिपूरमध्ये राहण्यास आहेत. त्यांना दोन मुले असून, गुरुवारी दुपारी त्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. थोड्या वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: Married woman commits suicide in Haripur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.