शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेदाणा, द्राक्ष उत्पादकांच्या अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By अशोक डोंबाळे | Updated: May 17, 2023 17:49 IST

सांगलीत ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते-पोलिसांत झटापट, संतप्त शेतकर्‍यांनी वाटला बेदाणा

सांगली : शासनाने द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला लाख रुपयांचे अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली द्राक्ष उत्पादकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेतकऱ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करताना पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. बेदाणा वाटून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला.

सांगलीतील विश्रामबाग चौकातून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी बेदाण्याचा हार करून गळ्यात घातले होते. शासनाकडून शेतकरीविरोधी धोरण राबविली जात आहेत, याच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. घोषणाबाजी करतच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रवेशद्वाराचे गट उघडून आता घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. अखेर प्रवेशद्वारातच आंदोलकांची सभा झाली. सभेनंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

आंदोलकांच्या मागण्या- सौद्यामध्ये बेदाण्याची होणारी उधळण १०० टक्के बंद करावी.- बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शासनाने शेतकऱ्यांना द्यावेत.- बेदाणा विक्रीनंतर पैसे २१ दिवसांत मिळावेत, त्यानंतर दिल्यास दोन टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे.- कीटकनाशकांच्या किमती कमी कराव्यात, त्यावरील जीएसटी कमी करावा.- शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करावा.५ जूनपासून पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या : महेश खराडेद्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत चालला आहे. उत्पादकांना अनुदान देण्याची राज्यस्तरीय मागणी आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी शासनाने उभे राहिले पाहिजे, मात्र त्याबाबत सरकार गंभीर नाही. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. ५ जूनला चड्डी मोर्चा काढून पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या मारण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना