शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहूजन आघाडीतर्फे कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा

By शरद जाधव | Updated: September 26, 2023 18:42 IST

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात ...

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. विकासाच्या नावाखाली विविध संस्थांचे झपाट्याने खासगीकरण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तर देशाची अर्थव्यवस्थाच भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी सांगलीत केला.सरकारी नोकरींचे कंत्राटीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी केले. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर टिकास्त्र सोडले.आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने बीएसएनल, एअर इंडियाचे खासगीकरण करत त्यातील कर्मचाऱ्यांची अडचण केली. आता शासनाच्या नव्या धोरणानुसार वर्ग एक पासून सर्वच पदावर कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करण्याचा डाव सुरू आहे. त्यातच संपूर्ण सरकारची मालकी असलेल्या रेल्वे, आरोग्य यंत्रणांचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा संस्था सरकारच्या मालकीच्या राहिल्या नाहीत तर आरक्षणाला अर्थच उरणार नाही. गोरगरीब घरातील मुलांच्या नोकरीची संधीच यामुळे जाणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, अभिजित पाटील, वंचितचे जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायगवळे, आनंदसागर पुजारी, अलीसो मुलाणी, क्रांतीताई सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

टॅग्स :SangliसांगलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीGovernmentसरकार