शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'मराठयांना सरसकट कुणबी दाखले नकोत, दिलेल्या दाखल्यांचीही चौकशी करा'

By संतोष भिसे | Updated: October 3, 2023 18:45 IST

सांगली : मराठ्यांना विरोध नाही, पण आमच्या ताटातले हिसकावू नका अशी भूमिका ओबीसी व्हिजीएनटी बहुजन परिषदेने व्यक्त केली. ओबीसींच्या ...

सांगली : मराठ्यांना विरोध नाही, पण आमच्या ताटातले हिसकावू नका अशी भूमिका ओबीसी व्हिजीएनटी बहुजन परिषदेने व्यक्त केली. ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात ओबीसी कार्यकर्त्यांनी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. यावेळी संजय विभुते, सुनील गुरव आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले  आहे की, ओबीसी आरक्षणाच्या विषयाचे राजकारण करु नका. काही राज्यकर्ते ओबीसींच्या आरक्षणात वाटे करण्याचे पाप जाणीवपूर्वक करत आहेत हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच मराठा समाजाने ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागत आहे. मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नव्हता, पण त्यासाठी ओबीसींचा बळी देता कामा नये. आमच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे.विभुते यांनी सांगितले की, जालन्यातील आंदोलन म्हणजेला ओबीसी आरक्षणाला धोका करण्याचे कटकारस्थान होते हे स्पष्ट झाले आहे. ओबीसींचे  आरक्षण संपविण्यासाठीच कुणबी दाखल्यांचा आग्रह धरला जात आहे. याद्वारे मराठा व ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे. पण त्याला ओबीसी समाज बळी पडणार नाही.आंदोलनात शरद झेंडे, शशिकांत गायकवाड, अरुण खरमाटे, संग्राम माने, संतोष खंडागळे, लक्ष्मण देसाई, शाम जाधव, प्रमोद क्षीरसागर, सुनिता बने, रावसाहेब बने आदी सहभागी झाले.

आंदोलकांच्या मागण्या अशा :- मराठ्यांना शिक्षण व नोकरीत स्वतंत्र आरक्षण द्यावे.- ओबीसींसाठी क्रिमीलेअर दाखल्यांची अट रद्द करावी.- सरकारी नोकऱ्यात कंत्राटी भरती करु नये.- मराठयांना सरसकट कुणबी दाखले नकोत, तसेच दिलेल्या दाखल्यांची चौकशी करावी.- अल्पसंख्यांक मुस्लिमांना संरक्षण द्यावे.- लोकसभा व विधानसभेत ओबीसींना लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे.

टॅग्स :SangliसांगलीOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण