शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद, पोलिस आणि नेते आंदोलकांच्या रोषाला बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:37 IST

राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले तर काही ठिकाणी पोलिसाना आणि नेत्यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात कडकडीत बंद, पोलिस आणि नेते आंदोलकांच्या रोषाला बळी काही ठिकाणी टायर पेटविण्याचे प्रकार, एस.टी. फोडली

सांगली : राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले तर काही ठिकाणी पोलिसाना आणि नेत्यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांची गाडी अडवून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज भाजपच्या मागे राहणार नाही अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी  केली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुंडलापूर येथे आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला.सांगील शहरात नागरिकांनी दैनंदिन सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली लेंगरे येथे एका एस. टी. बसवर दगडफेक झाली तर कवठेमहंकाळ तालुक्यात काही ठिकाणी टायर पेटविण्याचा प्रकार घडला.

सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या विटा बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विटा बंदच्या आवाहनासाठी हजारो युवक रस्त्यावर आले होते. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.शिराळा तालुक्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शेडगेवाडी फाटा येथे आंदोलकांनी बंदचे आवाहन केले होते. कवठेमहांकाळ शहरातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. कुंडलापूर येथे सकाळी आंदोलकांनी टायर पेटवून निषेध व्यक्त केला.

उमदी, वाळवा, आष्टा,आमणापूर येथील बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. म्हैसाळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मृत काकासाहेब शिंदे यांना श्रदांजली वाहून या घटनेचा निषेध करण्यात आला. आष्टा येथे आंदोलकांनी मोटर सायकल रॅली काढून काकासाहेब शिंदे याना श्रद्धांजली वाहिली.दरम्यान, इस्लामपुरात बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, तर लेंगरे (ता. खानापूर) येथे आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी एसटी बसच्या काचा फोडून आंदोलन तीव्र केले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSangliसांगली