शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रवेशबंदी, महापालिका क्षेत्रात गनिमी काव्याने निदर्शने करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 14:52 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सांगलीत येऊ न देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना सांगलीत येऊ देणार नाहीमराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सांगलीत येऊ न देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. 

दरम्यान , इस्लामपूर-सांगली रस्त्यावर आज सकाळी ८ वाजता अहीरवाडी ता. वाळवा फाट्यावर टायर पेटवून, काचेच्या बाटल्या फोडून रस्ता रोको करण्यात आले. इस्लामपूर येथे सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली.सोमवारी मुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदीबरोबरच संपूर्ण जिल्हा बंद व महापालिका क्षेत्रात गनिमी काव्याने निदर्शने करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, राहूल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका विशद केली.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असूनही त्याकडे सरकार लक्ष देत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सांगलीत येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश घेऊन जर मुख्यमंत्री सांगलीत आलेतर त्यांचे मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत करण्यात येईल.

मात्र, केवळ प्रचारासाठी मुख्यमंत्री आले तर त्यांना सांगलीत येऊ दिले जाणार नाही. सोमवारी जिल्हाभर बंद पाळण्यात येणार असून महापालिका क्षेत्रातील आचारसंहिता लक्षात घेता बंद न पाळता जोरदार निदर्शने करण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण