शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

जिल्ह्यात मराठा क्रांतीचा पुन्हा एल्गार

By admin | Updated: February 1, 2017 00:03 IST

आंदोलन शांततेत : सांगली, कुपवाडला ६५ आंदोलक ताब्यात, ठिकठिकाणी शासनाचा निषेध

सांगली : मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी सांगली-माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्यासमोर व कुपवाड रस्त्यावरील सूतगिरणी येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात संजयनगर व कुपवाड पोलिसांनी अनुक्रमे ३० व ३५ असे एकूण ६५ कार्यकर्ते ताब्यात घेतले. त्यांची लगेच सुटकाही करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सातपासूनच पोलिसांचा बंदोबस्त शहरातील प्रमुख चौकात तैनात झाला होता. साखर कारखान्यावर मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भोसले यांच्यासह शिवसेनेचे बजरंग पाटील, नगरसेवक उमेश पाटील, गौतम पाटील, अक्षय पाटील आदी सहभागी झाले होते. ३० कार्यकर्त्यांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ३९ ठिकाणी चक्का जामजिल्ह्यात एकूण ३९ ठिकाणी आंदोलन झाले. यामध्ये मिरज तालुक्यात सांगली-आष्टा रस्त्यावर लक्ष्मी फाटा, अंकली फाटा, सांगली-माधवनगर रस्त्यावर वसंतदादा साखर कारखाना, म्हैसाळ उड्डाण पूल, कवठेमहांकाळ तालुक्यात लांडगेवाडी फाटा, खरशिंग फाटा, नागज फाटा. जत तालुक्यात वळसंग, जत बसस्थानक, उमदी बसस्थानक. आटपाडी तालुक्यात नेलकरंजी फाटा, सांगोला चौक, आटपाडी, दिघंची बसस्थानक चौक, साठे चौक, साई मंदिर नाका चौक. .औदुंबरला बसची काच फोडलीभिलवडी : मराठा क्रांती मोर्चातर्फे पलूस तालुक्यातील भिलवडी, वसगडे, औदुंबर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. औदुंबर फाटा येथे अज्ञाताने दगड मारून एसटीची काच फोडली. भिलवडी व वसगडे गावातील प्रमुख रस्त्यावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. पंधरा मिनिटातच राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनावेळी आलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यात आला. शांततेत आंदोलन सुरू असतानाच काही आंदोलकांनी उभ्या असलेल्या बसवर (क्र. एमएच १२, सीएच ७७९७) दगडफेक केली. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील हारुगडे यांनी तात्काळ भेट देऊन आंदोलन थांबवून वाहतूक सुरळीत केली. आटपाडी, दिघंचीत रास्ता रोकोआटपाडी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी आटपाडी आणि दिघंचीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील साई मंदिर चौकात जि. प. चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता साई मंदिर चौकात आंदोलकांनी शांततेने रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी मोठमोठ्याने घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहने आंदोलकांनी रोखून धरली. अमरसिंह देशमुख यांची पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी समजूत काढली. तहसीलदार अजितसिंह पाटील यांनीही आंदोलनस्थळी येऊन, आंदोलन स्थगित करावे यासाठी प्रयत्न केले. सुमारे अर्ध्या तासानंतर राष्ट्रगीत म्हणून आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात विनायकराव पाटील, ऋषिकेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, जितेंद्र गिड्डे, अ‍ॅड. चेतन जाधव, वसंतराव पाटील, डी. एम. पाटील, डी. टी. पाटील, उत्तम पाटील, विलास नांगरे आदींनी सहभाग घेतला. दिघंची बसस्थानक चौकातही आंदोलन करण्यात आले. यावेळी बापूसाहेब गिड्डे, हणमंतराव देशमुख, गणेश माने, अतुल जाधव, विकास मोटे, अमोल काटकर, जितेंद्र मोरे, बाळासाहेब मोटे, सागर ढोले, नीलेश गिड्डे, अक्षय शिरकांडे, अनिल मोरे, सोपान काळे, अ‍ॅड. विलासराव देशमुख, अशोक देशमुख, युवराज मोरे, यश मोरे यांच्यासह समाजबांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.कडेगावात विटा-कऱ्हाड रस्त्यावर वाहतूक ठप्प कडेगाव : मराठा क्रांती मोर्चा समिती आणि मराठा बांधवांच्यावतीने कडेगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे कऱ्हाड-विटा रस्त्यावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दादासाहेब यादव, नेताजीराव यादव, राजाराम गरूड, अजित करांडे यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीच्यावतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अर्चना शेटे यांना देण्यात आले. अ‍ॅड. प्रमोद पाटील, रामचंद्र कणसे, सुनील मोहिते, समरजित गायकवाड, अभिजित महाडिक, विक्रम महाडिक, धनंजय देशमुख, भारत सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी, विकी थोरात, शाहीर यादव, राजाभाऊ यादव, अभिजित यादव उपस्थित होते