शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालगावच्या ‘त्या’ वसाहतीतील कुटुंबांना मिळाले २५ वर्षांनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:07 IST

मालगाव (ता. मिरज) येथील इनाम जमीन वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे १८० कुटुंबांना २५ वर्षांनंतर पाणी मिळाले आहे. सुमारे ६ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची सोय केली.

ठळक मुद्देग्रामपंचायतीकडून सोय : स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची केली सोय

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील इनाम जमीन वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे १८० कुटुंबांना २५ वर्षांनंतर पाणी मिळाले आहे. सुमारे ६ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची सोय केली. या भागात रस्ते, गटारी व इतर सर्व सुविधा देण्याचे नियोजन केल्याने ही कुटुंबे विकासाच्या प्रवाहात येणार आहेत.

मालगावातील इनाम जमिनीत सुमारे १८० कुटुंबांना भूखंड वाटप झाले. मात्र यासंदर्भातील वादामुळे ग्रामपंचायत दप्तरी नोंद नव्हती. त्यामुळे या भागात नागरी सुविधा नाहीत. केवळ मतदान करण्यापुरतीच ही कुटुंबे हक्कदार राहिली.विद्यमान गटनेते प्रदीप सावंत यांनी या प्रभागाचे सदस्य राजू भानुसे, स्मिता कुंभारकर यांच्या मदतीने संंबंधित जागेची ग्रामपंचायत दप्तरी भोगवटदार अशी नोंद करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भाजपचे सरपंच असलम मुजावर व सदस्यांनी प्रस्तावास संमती दिली. जि. प. बांधकाम सभापती अरुण राजमाने, मिरज पं. स. उपसभापती काकासाहेब धामणे व ग्रा.पं. गटनेते प्रदीप सावंत यांनी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने काम हाती घेतले. यावेळी सतीश बागणे, विलास होनमोरे, शीतल जत्ते आदी उपस्थित होते.

वनवास पुसून काढणारभविष्यात या भागातील वीज पुरवठा, रस्ते, गटारी या समस्यांबरोबरच घरजागा नावावर करण्यासाठी पुढाकार घेऊन या भागातील ग्रामस्थांनी वीस वर्षे भोगलेला वनवास पुसून काढण्याचे आश्वासन जि. प. बांधकाम सभापती राजमाने, पं. स. उपसभापती काकासाहेब धामणे यांनी दिले.मालगाव येथे इनाम जमीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे उद्घाटन अरुण राजमाने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी काकासाहेब धामणे, प्रदीप सावंत, असलम मुजावर, सतीश बागणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी