शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील विट्यात विधवा महिलांना मकर संक्रातीचे वाण, भरली ओटी पाहून फुटला अश्रुंचा बांध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 16:32 IST

दिलीप मोहिते  विटा : शासनाने विधवा प्रथा बंदीचे परिपत्रक काढले. पण, समाजात विधवांना अनेक सण, उत्सव, हळदी-कुंकू कार्यक्रमापासून दूर ...

दिलीप मोहिते विटा : शासनाने विधवा प्रथा बंदीचे परिपत्रक काढले. पण, समाजात विधवांना अनेक सण, उत्सव, हळदी-कुंकू कार्यक्रमापासून दूर रहावे लागत आहे. त्यामुळे ही प्रथा आजही खोलवर जखम करून जाते. विट्याच्या कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी विधवा प्रथा बंदीसाठी दमदार पाऊल टाकले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी विधवांना संक्रांतीचे वाण देऊन यथोचित सन्मान केला. ओटी भरल्यानंतर विधवांच्या अश्रूंचा बांध फुटून त्यांना गहिवरून आले.मकर संक्रात हा सुहासिनींचा आवडता सण. पण विधवा महिलांना सणात कोठेच प्राधान्य नाही. पतीच्या जाण्यानंतर समाजाचे टोमणे, दु:ख, अवहेलना त्यांना सहन कराव्या लागतात, त्यात तिचा काय दोष? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न समाजाने कधीही केला नाही. परंतु विधवा प्रथा बंद करण्यासाठी विट्याच्या डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी समाजाला हाक दिली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१७ मे २०२२ रोजी समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनाबाबतचे परिपत्रक काढले. तत्पूर्वी विधवांच्या सन्मानासाठी पहिले पाऊल डॉ. स्वाती शिंदे यांच्या माध्यमातून १९९२ साली पडले.

आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी गावातील विधवा लता बोराडे यांनीही १९९७ पासून पाऊल घराबाहेर टाकले होते. विवाहानंतर २५ व्या दिवशी त्यांना वंध्यत्व आले. त्यानंतर डी.एड्. चे प्रशिक्षण घेणाऱ्या बोराडे यांना दि.८ मार्च १९९५ रोजीच्या महिला मेळाव्यात स्वाती शिंदे यांनी कपाळावर हळदी-कुंकू लावले. त्यावेळी उपस्थित महिलांची कुजबुज सुरू झाली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवले.विधवा प्रथा बंदीसाठी स्वाती शिंदे-पवार यांनी समाजाला ‘एक हाक.. सन्मानासाठी’चा नारा दिला आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून त्यांनी सुहासिनी महिलांच्या हळदी-कुंकू समारंभानंतर विधवांना एकत्रित करीत संक्रांतीचे वाण दिले.

विधवांना समाजात सन्मान मिळावा, यासाठी धडपड सुरू आहे. परंतु ही धडपड एका-दोघींनी करून चालणार नाही. तर त्यासाठी समाजानेही पुढे येणे गरजेचे आहे. समाजाने बदलावं, विधवा प्रथा बंदी, विधवा विवाह, परित्यक्त्या विवाह यात समाजाने माझ्यासोबत चालावे. -डॉ. स्वाती शिंदे-पवार

टॅग्स :Sangliसांगली