शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळचा कालवा पुन्हा ओव्हर फ्लो, पिके पाण्यात; बेडग रस्त्यावरील दोन तास वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 19:23 IST

जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना दुसरीकडे पाण्याची नासाडी

म्हैसाळ : बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्र. तीनमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बुधवारी सकाळी कालवा ओव्हर फ्लो झाला होता. यामुळे आरग बेडग रस्त्यावरून कालव्याचे पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती, कालव्याचे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले.मिरज पूर्व भागात शेतकऱ्यांना २४ तासाला २५ हजार रुपये भरून कालव्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पैसे भरूनही समाधानकारक पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे मात्र ओव्हर फ्लोमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेतजमिनीमधील माती खरडून गेली आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात.

त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असतानाच पुन्हा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने म्हैसाळ योजनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंप हाऊसमधील एकूण ११५ पैकी ७२ पंप सुरू आहेत. दुरुस्तीसाठी ४२ कोटी खर्च करूनही विद्युत मोटारींची दुरवस्था आहे. यांत्रिकी विभागासह म्हैसाळ योजनेलाच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. पालकमंत्री हटाव म्हैसाळ योजना बचाव, असे म्हणावे लागेल. - विज्ञान माने (जिल्हा संघटक राष्ट्रवादी, सांगली)

टॅग्स :Sangliसांगली