शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

बेरजेच्या राजकारणाची परंपरा कायम ठेवा

By admin | Updated: May 10, 2017 22:18 IST

जयंत पाटील : क्रांतिसिंहांच्या नावाने काहींचा प्रसिद्धीचा स्टंट, येडेमच्छिंद्रेत सभापती, सदस्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क --शिरटे : वाळवा तालुक्यात आपला कोणी विरोधक नाही. सगळे आपलेच आहेत़ आपण गेल्या ३०-३५ वर्षांपासून बेरजेच्या राजकारणाची परंपरा सुरू केली आहे. ती तशीच पुढे चालू ठेवा, असा सल्ला माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी दिला. याचवेळी त्यांनी, काहीजण गावात येऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने प्रसिध्दीचा स्टंट करतात़; मात्र वाळवा तालुक्यातील जनता हुशार आहे़ त्यांना कोण काम करतो आणि कोण नुसतीच स्टंटबाजी करतो, याची जाणीव असल्याचा टोलाही मारला.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील तसेच नूतन पं़ स़ व जि़ प़ सदस्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते़ प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.आ़ पाटील म्हणाले, जि़ प़ , पं़ स़ उमेदवारी निश्चित करताना फार मोठी नाराजी निर्माण होते़ म्हणूनच कोणीही निवडून या आणि आमच्याकडे या, असे म्हणावेसे वाटते़ सध्या खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले आहे़ सहकारी साखर कारखान्यांचे पाय जखडून खासगी कारखानदारीबरोबर स्पर्धा लावली जात आहे़ डॉ़ भोसले म्हणाले की, आमदार जयंत पाटील यांनी अर्थमंत्री असताना ग्रामीण भागाच्या विकासाला मोठा निधी दिला़ त्यांनी या परिसरात केलेल्या विकास कामांच्या १० टक्के विकास कामेही इतर तालुक्यात झालेली नाहीत़ या सर्व कामांच्या बळावरच भाजपच्या लाटेतही ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, हे कौतुकास्पद आहे.कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, बाबासाहेब पवार, माजी जि़ प़ अध्यक्ष देवराज पाटील, पं़ स़ सदस्य आनंदराव पाटील, सौ़ रूपाली सपाटे, सौ़ सुप्रिया भोसले, तसेच सौ़ सुस्मिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक अ‍ॅड़ संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले़ शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले़ हौसेराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, धोंडीराम जाधव, धनाजी बिरमुळे, सौ़ संध्या पाटील, सौ़ राजश्री एटम, आनंदराव पाटील, शंकर चव्हाण, सुजित मोरे, सौ़ धनश्री माने, गटविकास अधिकारी राहुल गावडे, अजित पाटील, महिपती पाटील, प्रताप पाटील, दिलीप पाटील, सुनील पोळ, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.जयंतरावांना पत्रएका विद्यार्थिनीने आ. जयंत पाटील यांना पत्र लिहून, या पत्रात विद्यार्थिनींच्या एसटीसह विविध समस्या मांडून मुली व महिलांच्या असुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली होती. आ़ पाटील यांनी या पत्रातील काही भागाचे वाचन करून ते पत्र सभापती हुलवान यांच्याकडे सुपूर्द केले़ तिने मांडलेल्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी दिला.