शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

पोलिसाच्या खुनातील मुख्य संशयित कोल्हापुरात जेरबंद - श्रीमुखात लगावल्याने खून केल्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 22:45 IST

येथील पोलीस शिपाई समाधान भगवान मांटे (वय २९) यांचा धारदार शस्त्राने खून करणारा मुख्य संशयित झाकीर आझमुद्दीन जमादार (३१, रा. सह्याद्रीनगर, मंगल कॉलनी, विश्रामबाग, सांगली) याला कोल्हापुरातील पुणे-बंगळूर

सांगली : येथील पोलीस शिपाई समाधान भगवान मांटे (वय २९) यांचा धारदार शस्त्राने खून करणारा मुख्य संशयित झाकीर आझमुद्दीन जमादार (३१, रा. सह्याद्रीनगर, मंगल कॉलनी, विश्रामबाग, सांगली) याला कोल्हापुरातील पुणे-बंगळूर

राष्ट्रीय महामार्गावरील शाहू नाक्याजवळ जुना राजवाडा पोलिसांनी पकडले. बुधवारी रात्री हॉटेल रत्ना डिलक्समध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादातून मांटे यांनी श्रीमुखात लगावल्याने त्यांचा खून केल्याची कबुली जमादार याने दिली आहे.

सांगलीत विश्रामबाग येथे कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता मांटे यांचा खून करण्यात आला होता. खुनाची घटना हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली होती. कॅमेºयातील फुटेजवरून संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी झाकीर जमादार व त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली होती. अन्सार पठाण (३०) व राजू नदाफ (२९) या साथीदारांना बुधवारी पकडले होते. पण जमादार फरारी होता. तो पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येणार असल्याची माहिती कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंग खोचे यांना मिळाली. त्यानुसार खोचे यांच्या पथकाने पुणे-बंगळूर महामार्गावर सापळा रचला. पथकास पाहताच जमादारने पलायन केले. पण पाठलाग करून त्यास पकडण्यात आले. जमादारचे वडील पाटबंधारे विभागातून, तर आई शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाली आहे. तो स्थापत्य अभियांत्रिकीचा पदविकाधारक (डिप्लोमा) आहे. 

हत्यार गटारीत फेकलेजमादार यास सांगली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्याला घेऊन रात्री उशिरा पथक सांगलीत दाखल झाले. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, मांटे यांचा खून करण्यासाठी वापरलेले हत्यार हॉटेल रत्ना डिलक्स परिसरातील गटारीत फेकून दिल्याची कबुली त्याने दिली आहे. शुक्रवारी या हत्याराचा शोध घेतला जाणार आहे. 

हॉटेल सील; परमिट रूमचा परवाना रद्दमांटे यांचा खून झालेल्या रत्ना डिलक्समधील परमिट रूमसह हॉटेल गुरुवारी दुपारी सील करण्यात आले. महापालिकेचे आचारसंहिता भरारी पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. दारूचा साठा तसेच परमिट रूमला उत्पादन शुल्क विभागाने, तर हॉटेलला पालिकेच्या पथकाने सील ठोकले. सायंकाळी या हॉटेलच्या परमिट रूमचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली.दोघांना कोठडीमांटे यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या दोन संशयितांना गुरुवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मुख्य संशयित जमादार यास शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.‘एन्काऊंटर’च्या भीतीने शरणखून केल्यानंतर जमादार कर्नाटकातील हुबळी येथे गेला. तेथून तो कोल्हापुरात नातेवाईकांकडे आश्रयाला आल्याची माहिती मिळताच त्याला पकडण्यात यश आले, असे पोलीस सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात पोलीस आपला ‘एन्काऊंटर’करतील, या भीतीने तो मूळ सांगली जिल्'ातील पण सध्या कोल्हापुरात असलेल्या पोलीस अधिकाºयाच्या मध्यस्थीने शरण आल्याची चर्चा आहे.आठ पोलीस फैलावरमांटे यांचा खून झाला, त्यावेळी आठ पोलीस हॉटेल रत्ना डिलक्समध्ये दारू पिण्यास गेले होते. या आठ पोलिसांना जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी फैलावर घेत कानउघाडणी केली. या पोलिसांवर खातेनिहाय कारवाई होण्याचे संकेत आहेत.शासकीय इतमामात अंत्यसंस्कारमांटे यांचे मूळ गाव बुलडाणा आहे. २०१३ मध्ये ते सांगली पोलीस दलात भरती झाले होते. केवळ पाच वर्षेच त्यांची सेवा झाली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन तपासणी करून त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी नातेवाईकांना देण्यात आले होते. त्यानंतर पार्थिव मूळ गावी बुलडाणा येथे नेऊन, गुरुवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीस खूनप्रकरणी दोन अधिकारी निलंबित;हॉटेल सील : निवडणूक आयुक्तांची कारवाई; मुख्य संशयितास कोल्हापुरात अटकसांगली : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई समाधान भगवान मांटे (वय २९) यांचा धारदार शस्त्राने सपासप १८ वार करून खून करणारा मुख्य संशयित झाकीर झुल्फीकार जमादार (२८, रा. हडको कॉलनी, लक्ष्मीनगर, कुपवाड रस्ता, सांगली) यास कोल्हापूर येथे पकडण्यात गुरुवारी सकाळी यश आले. दरम्यान, निवडणूक काळात हलगर्जीपणा केल्याबद्दल राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दोन अधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.निवडणूक आयुक्त गुरुवारी जिल्यातील महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सांगलीत आले होते. यावेळी रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू असल्याची बाब पोलिसाच्या खून प्रकरणामुळे त्यांच्यासमोर आली. त्यांनी तातडीने संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदेवे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरव या दोघांना निलंबित केले. निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांची तातडीने चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, खुनाची घटना ज्याठिकाणी घडली, त्या हॉटेल रत्नाचा परवानाही सील करण्यात आला आहे.

सांगलीत विश्रामबाग येथे कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता पोलीस शिपाई मांटे यांचा खून करण्यात आला होता. खुनाची घटना हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली होती. कॅमेऱ्याच्या फुटेजवरून संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी झाकीर जमादार व त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली होती. अन्सार पठाण (३०) व राजू नदाफ (२९) या साथीदारांना बुधवारी पकडण्यात यश आले होते. मात्र जमादार फरार होता. तो कोल्हापुरात नातेवाईकांकडे आश्रयाला गेल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडाविरोधी पथक बुधवारी रात्री कोल्हापूरला रवाना झाले होते. तेथील राजवाडा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी जमादारला जेरबंद केले. त्याला घेऊन दुपारी पथक सांगलीत दाखल झाले. मांटे यांचा खून करण्यासाठी वापरलेल्या हत्याराबाबत त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.